ढिंग टांग : आमि तुमाके छाडबो ना..!

दीदींच्या ‘खुर्ची आंदोलनाने’ बंगालच्या राजकारणात घटनात्मक पेच; भाजपवर जागा चोरीचा आरोप, नैतिक विजय आपलाच असल्याचा ममतांचा दावा
Political Chess in Bengal: Didi’s Chair Protest and the Rise of Constitutional Experts

Political Chess in Bengal: Didi’s Chair Protest and the Rise of Constitutional Experts

Sakal

Updated on

सु श्री ममतादीदी जाम भडकल्या आहेत. यंत्रणांना हाताशी धरून कमळ पक्षाने त्यांच्या शंभराहून अधिक जागा चोरल्या. एका अर्थी त्यांची हक्काची खुर्चीच चोरून नेली, असा त्यांचा आरोप आहे. कमळवाल्यांनी चोरीचे उटपटांग उद्योग केले असले तरी नैतिक विजय आपलाच झाला असल्याने खुर्ची सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नॉय असे त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे घटनात्मक पेचप्रसंग उभा राहिल्याचे बोलले जात आहे. लागलीच अनेक घटनातज्ज्ञ पोथ्या उघडून बसले. घटनात्मक पेच आल्याशिवाय घटनातज्ज्ञांचा भाव वधारत नाही, हे एक घटनात्मक सत्य आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com