Nashik | कार्यप्रवण ‘सारडा संस्कृती’ची शंभर वर्षे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sarda Group Nashik

Nashik | कार्यप्रवण ‘सारडा संस्कृती’ची शंभर वर्षे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एखाद्या उद्योगाची उभारणी करायची झाल्यास ती कशी करावी, उद्योग कसा विस्तारावा, कर्मचारी-कामगारहित कसं जपावं, आपण समाजाचं काही देणं लागतो, ही भावना मनात रुजवून त्यानुसार कार्यप्रवण कशारीतीने राहावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सारडा समूह. या समूहाने शंभरीत प्रवेश केला आहे. सिन्नरला ओळख देणारा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा उद्योग समूह अनेक कुटुंबांचा आधार बनतो. कार्यसंस्कृतीची उदाहरणं दुर्मिळ होत असताना या मूल्याची नव्याने ओळख करून घ्यायची झाल्यास सारडा समूहाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते.
- संपादक

शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९२२ मध्ये सारडा उद्योग समूहाची पाळंमुळं सिन्नरमध्ये रोवली गेली. हा उद्योग समूह आता शंभर वर्षांचा झाला आहे. सारडा उद्योग समूहाचे संस्थापक (वै.) बस्तीरामजी सारडा यांनी या उद्योग समूहाचे बीजारोपण केले. अवघ्या तीन कामगारांना बरोबर घेऊन सुरू केलेल्या या उद्योगात आज सुमारे वीस हजारांवर कामगार कार्यरत आहेत. व्यवसायाबद्दलची सचोटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर सारडा उद्योग समूहाने इथवर भरारी घेतली आहे. शांत, संयमी व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीरंग सारडा यांच्याकडे सध्या समूहाची धुरा आहे. तर चौथ्या पिढीचे प्रतिनिधी हर्षवर्धन आणि आर्या सध्या वडिलांसोबत अभ्यास, निरीक्षणात गुंग आहेत.

हेही वाचा: माउंट शिवलिंग : कलाटणी देणारी मोहीम

बिडी उद्योगात ISI हा मार्क मिळविणारी पहिली कंपनी

उंट बिडीपासून सुरू झालेला व्यवसाय सातासमुद्रापार पोचला आहे. विविध देशांत उंट बिडी निर्यात होते. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातही उद्योग समूहाच्या कक्षा रुंदावल्या. या समूहात अनेक नवनवीन व्यवसायांची भर पडत गेली. त्यात प्रामुख्याने सुधा सॉफ्ट ड्रिंक, नाशिक सिटी सेंटर मॉल, योगी कंठिका, योगी फार्मा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा सारडा डेअरी फार्म, मनाली येथील अँपल कंट्री हे तारांकित रिसॉर्ट अशी क्षितिजे विस्तारत गेली. दर्जेदार उत्पादनासाठी असलेला ISI हा मार्क मिळविणारी संपूर्ण बिडी उद्योगातील उंट बिडी ही पहिली कंपनी आहे, हे विशेष.
इनोव्हेटिव्ह ऑफ मीडिया युजेस, अ. रा. भट उद्योजकता पुरस्कार, जागतिक पातळीवरील मॉण्डे सिलेक्शन ॲवॉर्ड, सुधा सॉफ्ट ड्रिंकसाठी ॲमस्टरडॅम येथील इंटरनॅशनल ॲवॉर्ड, अलीकडेच भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नाशिक महापालिकेकडून सिटी सेंटर मॉलला प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. हे पुरस्कार म्हणजे सारडा समूहाच्या शिरपेचात रोवलेले मानाचे तुरे आहेत.

कामगार-कर्मचारीहित सर्वोच्च

संस्थेतील प्रत्येक घटकाचे हित जपण्यास या समूहात प्राधान्य दिले जाते. संपूर्ण भारतात बिडी कामगारांना पीएफ लागू करणारी ही पहिली संस्था ठरली. बिडी कामगारांच्या मुलांसाठी बालवाडी, कर्मचारी व कामगारांसाठी गटविमा, कर्मचाऱ्यांसाठी सवलतीच्या दरात गृहप्रकल्प उभारणी, त्याबरोबर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी उच्चशिक्षणासंदर्भात आर्थिक मदत, घरातील लग्नकार्य, आजारपण यासाठी देखील संस्था कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असते. बिडी कामगारांची मुले भविष्यात बिडी कामगार बनू नये, त्यांना अन्य क्षेत्रात ठसा उमटवता यावा, यासाठी सारडा समूहात विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्यासाठी विविध कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. जेणेकरून ते अर्थार्जन करून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपल्या कामगारांना कसा अधिकाधिक मिळेल, यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. थोडक्यात, संस्थेतील प्रत्येक घटकास कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच जिव्हाळ्याची वागणूक देऊन त्यांच्या हिताची जोपासना व सर्वांगीण प्रगती कशी होईल, यासाठी विशेष लक्ष दिले जाते.


सध्या संस्थेत कार्यरत असलेले कर्मचारी

पाच वर्षपावेतो सेवेत असलेले कर्मचारी : ३९४
पाच ते दहा वर्ष सेवेत असणारे कर्मचारी : ३६५
दहा ते २० वर्ष सेवेत असणारे कर्मचारी : २५३
२० ते ३० वर्ष सेवेत असणारे कर्मचारी : ६८
३० वर्षांहून अधिक काळ सेवेत असणारे ३८ कर्मचारी
असे एकूण एक हजार ११८ कर्मचारी.

सामाजिक बांधिलकीची परंपरा

व्यवसायातील सचोटीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा सारडा उद्योग समूहाने शंभर वर्षांपासून जोपासली आहे. त्यात नाशिक, सिन्नर, संगमनेर येथे शैक्षणिक विद्यालयांची उभारणी, आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्था, धर्मशाळा, पंढरपूरच्या चंद्रभागा तीरावरील धर्मशाळा, नाशिकमधील रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल, महाबळेश्‍वर येथील हॉलिडे होम, नाशिक शहरातील वाहतूक बेट, भव्य वेदमंदिर व वेद पाठशाळा या प्रमुख सामाजिक उपक्रमांत सतत योगदान असते. याबरोबरच वेदपंडितांसाठी दिला जाणारा वेद वेदांग पुरस्कार, सामाजिक संस्थांसाठी असलेला ‘सारडा समान संधी पुरस्कार’ या सामाजिक बांधिलकेच्या महत्त्वाच्या खुणा आहेत. अलीकडेच नाशिक येथील जलालपूर या गावात ४० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली शाळेची इमारत, तसेच प्रवचनकार व कीर्तनकारांसाठी दिली गेलेली ६६ लाख रुपये ‘कोरोना आपत्ती आर्थिक सहाय्यता’ हे उपक्रम सामाजिक दायित्वाची प्रचिती देणारे आहेत.

हेही वाचा: शिकण्याची प्रक्रिया कधीच संपत नाही...

नाशिककरांसाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करून त्याचा सर्वांना विनामूल्य आस्वाद घेता येतो, हा विशेष उपक्रम गेली अनेक वर्षे सारडा समूहाकडून सातत्याने राबविला जात आहे. गरजूंना मदत, अतिथींचे स्वागत आणि कामगार, कर्मचाऱ्यांना प्रगत करणे ही खास ‘सारडा संस्कृती’ आहे.

loading image
go to top