5G Network : ‘५ जी’ची आतुरता धक्कादायक!

इंटरनेट स्पीड आणि वेगवान कनेक्टिव्हिटीसाठी अगदी आतुरतेने आपण ‘५ जी’ची वाट पाहतो आहोत; पण का? कशासाठी?
5g network facility dangerous to environment internet speed juhi chawla
5g network facility dangerous to environment internet speed juhi chawlaSakal

- जुही चावला

इंटरनेट स्पीड आणि वेगवान कनेक्टिव्हिटीसाठी अगदी आतुरतेने आपण ‘५ जी’ची वाट पाहतो आहोत; पण का? कशासाठी? ‘५ जी’चे दुष्परिणाम सर्वांनाच माहिती असले तरी समजून कोण घेतो, अशी परिस्थिती आहे.

गेली बरेच महिने आपण ‘५ जी’, मोबाईल टॉवर रेडिएशन आणि मोबाईल फोन रेडिएशन यांचे आपल्यावर अन् पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी बोलतो आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे मला मेल येतात, त्यांचा प्रतिसाद येतो...  ते वाचून माझा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे, याची खात्री होते.

 काही आठवड्यांपूर्वी मी तुम्हाला  क्लेअर एडवर्डस् आणि बॅरी ट्रॉवर यांच्या ‘५ जी’बाबत २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीविषयी सांगितले होते.  काही दिवसांपूर्वी ती मुलाखत मी पुन्हा ऐकली. ज्या माहितीभोवती माझे मन घुटमळत होते त्याविषयी आज बोलू या. पण, त्याआधी क्लेअर एडवर्डस् आणि बॅरी ट्रॉवर कोण आहेत, याविषयी जाणून घेऊ.

क्लेअर एडवर्डस् गेली १८ वर्षे संपादक म्हणून संयुक्त राष्ट्रांसाठी कार्यरत होत्या. संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यांनी ‘५ जी’बाबत जनजागृतीचे काम केले; परंतु त्याला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

तसेच पृथ्वी आणि अंतराळातील ‘५ जी’ रोखावे यासाठी आंतरराष्ट्रीय आवाहन या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर २०१८ मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. गेली पाच वर्षे त्या ‘५ जी’चे दुष्परिणाम आणि ते थांबवणे का गरजेचे आहे, यासाठी प्रचारक म्हणून कार्यरत आहेत.

बॅरी ट्रॉवर यांनी १९५९ मध्ये लष्करात जाण्यासाठी सूक्ष्म लहरींचा (मायक्रोवेव्ह) अभ्यास सुरू केला. ते मायक्रोवेव्ह युद्धात प्रशिक्षित लष्करी अधिकारी आहेत. आण्विक आणि अणू भौतिकशास्त्रात पारंगतही आहेत.

त्यांचा पहिला प्रबंध मायक्रोवेव्ह स्केलच्या बाबतीत आहे. त्यांचा उच्च शिक्षणातील प्रबंध पर्यावरणाच्या मेंदूवरील परिणामांवर आधारित आहे.  १९७२ मध्ये ते निवृत्त झाल्यापासून आतापर्यंत रेडिएशनच्या धोकादायक परिणामावर व्याख्यान देत आहेत.

 क्लेअर एडवर्डस् यांनी बॅरी ट्रॉवर यांच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये ‘५ जी’च्या लहरींचे जे विवेचन केले आहे त्याबाबत सांगते. ते म्हणतात, ‘‘तुम्ही एखादा रिसर्च पेपर लिहिता, तेव्हा तुम्ही त्या गोष्टीत इतके गढून जाता की त्या विषयाशी निगडित छोट्यातली छोटी गोष्टही तुम्हाला खोलवर विचार करण्यास भाग पाडते...

असा अनुभव मला ‘पर्यावरणाचा मेंदूवरील परिणाम’ हा रिसर्च पेपर लिहिताना आला. या सर्व विचारातून अलिप्त राहण्यासाठी मी स्वतःला चार महिने एका खोलीत दोन हजार रिसर्च पेपरसोबत कोंडून घेतले. या वेळी माझ्या पत्नीलादेखील या खोलीमध्ये प्रवेश नाकारला होता.

त्याबद्दल विविध माहिती घेताना जे काही समोर आले ते वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. संभोगानंतर शुक्राणू अंड्याच्या संपर्कात येतात, तेव्हा त्या अवस्थेपासून ते पुढच्या सहा ते आठ आठवड्यांपर्यंत महिलेला आपण गर्भवती असल्याचे समजत नाही. 

त्यानंतर दवाखान्यात जाऊन चाचणी केल्यावर ती गर्भवती असल्याचे कळते. हा सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी स्त्री व पुरुष युग्मकांच्या मीलनाने तयार झालेल्या बीजांडासाठी अत्यंत  धोकादायक असतो. कारण या काळामध्ये ते ‘५ जी’ लहरींच्या आकाराचे असतात आणि हे बीजांड द्रवपदार्थ असल्याने थोडे ओलसर असतात.

अशा परिस्थितीत ते एखाद्या इलेक्ट्रिक कंडक्टरप्रमाणे असतात. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर बाळ हे विद्युत वाहक म्हणून काम करते. हे मायक्रोवेव्ह बाळामध्ये जातात, त्या वेळी ते एरियल म्हणून काम करते आणि मग विद्युत प्रवाह आईच्या माध्यमातून जमिनीवर जातो.

म्हणजेच पोटात असणारे बाळ हे आईच्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व मायक्रोवेव्हचा वैयक्तिक रिसिव्हर होते. साधारण  १७४५ मध्ये लोकांना माहीत होते, की पाणी बॅटरी म्हणून कार्य करते. पहिल्या बॅटरी या  पाण्यापासून बनवल्या गेल्या होत्या.

महिलांना गर्भाशयात पाणी साठविण्याचा चार्ज मिळाला आहे आणि बाळाला तो आईच्या माध्यमातून एरियल म्हणून काम करण्यासाठी मदत करतो.  आमच्या अंदाजाप्रमाणे  गर्भपात, मृत जन्म आणि अनुवांशिकदृष्ट्या व्यंग घेऊन जन्माला आलेल्या मुलांचे प्रमाण हे दोन पिढ्यांमध्ये आनुवंशिक असेल, म्हणजेच आठपैकी फक्त एक निरोगी मूल जन्माला येईल.’’

 आहे ना अतिशय धक्कादायक माहिती आणि तरीही आपण फास्ट इंटरनेट स्पीड, कनेक्टिव्हिटी या सर्वांसाठी अगदी आनंदाने, आतुरतेने ‘५ जी’ची वाट पाहतो आहोत. का? कशासाठी? याचे उत्तर आहे का आपल्याकडे?

आपल्यासाठी सर्वात जास्त प्रिय कोण, असे विचारले तर जराही न विचार करता तुम्ही म्हणाल, माझी मुले. मग तुम्हाला तुमच्या मुलांसाठी नेमके काय हवे आहे? कुठल्या प्रकारचे जग आपण त्यांना वारसा म्हणून देत आहोत.

त्यांच्या भविष्यासाठी काय करतो आहोत? ‘५ जी’ आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांनाच माहिती आहेत, आपण सतत ते वाचतो आहोत, ही माहिती आपल्या समोर येते आहे; पण यावर आपण काय करणार आहोत? तुमचा निर्णय काय आहे? तुम्ही काय ठरवले आहे? मी काय करायचे ते ठरवले आहे आता तुम्ही काय निर्णय घेणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com