esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 8 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 8 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : ज्येष्ठ कृष्ण १४, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय पहाटे ५.११, चंद्रास्त सायंकाळी ६.०१, सूर्योदय ६.०%, सूर्यास्त ७.१४, शिवरात्री, भद्रा, भारतीय सौर आषाढ १७ शके १९४३.

दिनविशेष -

१९१६ : मराठी कादंबरीकार व कथा, चरित्रे इ. साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळणारे लेखक गोपाळ नीलकंठ दांडेकर यांचा जन्म. त्यांच्या ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’ या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले.

१९९६ : भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष प्रो. यू. आर. राव यांना द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय ‘विक्रम साराभाई पुरस्कार’ जाहीर. हा पुरस्कार मिळविणारे श्री. राव हे पहिले भारतीय संशोधक आहेत.

१९९७ : बीजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजूरानी देवीने रौप्यपदक पटकाविले.

२००१ : तबलाविभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचे कोल्हापूर येथे निधन.

२००३ : संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व समीक्षक डॉ. ह. श्री. शेणोलीकर यांचे निधन. ‘मराठी तत्त्वज्ञान संस्था ः वर्णनात्मक कोश’ हे डॉ. शेणोलीकर यांचे महत्त्वाचे व मोठे काम होय. ‘ज्ञानेशांची अमृतवाणी’, ‘प्राचीन मराठी वाड्‌मयीन स्वरूप’, ‘नामयाची अमृतवाणी’, ‘महाराष्ट्र संस्कृती - घडण आणि विकास’ ही संशोधनात्मक व समीक्षात्मक आणि ‘मायणीची मंजुळा’ ही त्यांची कादंबरी प्रकाशित झाली आहे.

दिनमान -

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लागतील.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

सिंह : आर्थिक सुयश लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

कन्या : उत्साह, उमेद वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. भाग्यकारक घटना घडेल.

तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गुरूकृपा लाभेल.

वृश्‍चिक : वाहने सावकाश चालवावीत. एखादी जबाबदारी येवून पडेल.

धनु : वैवाहिक सौख्य लाभेल. आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कुंभ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.

मीन : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

loading image