Marathi moral story : कष्ट आमचे अन् डल्ला डॉनचा! खंडणीपासून वाचण्यासाठी बनवला 'सिक्रेट मिशन' ग्रुप

Funny Marathi Stories with Moral Lessons : अंडरवर्ल्ड डॉन सिंव्हाच्या खंडणी वसुलीला कंटाळलेल्या मुंबईतील प्राण्यांनी चतुर कोल्ह्याच्या मध्यस्थीने काढलेला सुवर्णमध्य आणि शेवटी खानदानी श्रीमंत चिंटू सशावर आलेली खंडणी देण्याची पाळी सांगणारी एक रंजक बोधकथा.
Funny Marathi Stories with Moral Lessons

Funny Marathi Stories with Moral Lessons

esakal

Updated on

सारिका चाटुफळे-कुलकर्णी

मुंबई नामक जंगलात पुष्कळ प्राणी राहत असत. त्यांचा राजा होता अंडरवर्ल्डचा डॉन सिंव्हा. मुंबईचा राजा आहे असे सांगून सगळ्या प्राण्यांकडून तो बळजबरी खंडणी वसूल करत असे. सगळ्या प्राण्यांकडे जावे, त्यांची पाकिटे रिकामी करून आपली आयाळ भरून घ्यावी असे त्याचे काम होते. मुंबईतील प्राण्यांना भीती वाटू लागली, की सिंव्हा जर असाच करत राहिला तर मुंबईतील प्राण्यांनी कमवायचे काय आणि खायचे काय? अशाने प्राण्यांची कष्ट करून कमावण्याची इच्छा मरून जाईल. एक दिवस मुंबईत कष्ट करून पैसे कमावणारे कोणी शिल्लक राहतील की नाही अशी भीती प्राण्यांना वाटू लागलेली होती.

संपूर्ण मुंबई नगरीत गोंधळ उडाला. जिकडे तिकडे सिंव्हा डॉनचे पंटर फिरत असत. दिवसा ढवळ्या प्राणी बाहेर पडू शकत नव्हते. वटवाघूळ तर रात्रभर जागूनही उलटेच लटकत असे. अस्वलाला मधाचा क्रायसिस निर्माण झालेला होता. बाहेर न निघण्याचं इतकं प्रेशर कोंबडीने घेतलं होतं, की त्या प्रेशरने ती रोज डझनभर अंडी देत असे. माकडांनी आपली हाउसिंग सोसायटी झाडावर शिफ्ट केली होती. वेश बदलून कित्येक प्राणी बाहेर पडत असले, तरीही सिंव्हा त्यांना बरोबर गाठत असे.

Funny Marathi Stories with Moral Lessons
Marathi Theatre BTS stories : चारशे तीस सव्वीस ऐंशी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com