
राज कपूर यांच्या अष्टपैलू ओळख होण्याच्या गोष्टी अनेक. आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटांतील नायिकांशी जणू एकरूप होत जाणं हेही त्यांचं वैशिष्ट्य गाजलं. राज कपूर म्हणत, ‘जब तक कोई नायिका मुझ मे समा न जाए, मुझे उसके साथ काम करने मे मजा ही नहीं आता...’ राज कपूर यांच्यामधील कल्पक दिग्दर्शक आपल्या चित्रपटातील अभिनेत्रींमधील गुणवत्ता व सौंदर्य पडदाभर खुलवायचा...