अमेठीत महिलांनी रोखला राहुल गांधींचा ताफा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016

अमेठी- अमेठी या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा ताफा आज (शुक्रवार) काही महिलांनी रोखून धरला. अंगणवाडी सेविका असलेल्या 150 महिलांनी त्यांचे मानधन वाढावे, अशी मागणी करत या वेळी जोरदार घोषणाबाजी केली. 

"आम्हाला त्यांना भेटायचे आहे‘ असे म्हणत महिलांनी त्यांच्या कारला घेराव घातला. पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करीत महिलांना तेथून बाजूला केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी सदर महिलांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी आपल्या मागण्यांचे निवेदन महिलांनी त्यांना दिले. तीन दिवसांच्या दौऱ्यात राहुल यांना विविध ठिकाणी निदर्शनांचा सामना करावा लागला. आमच्या समस्या मांडण्यासाठी आम्ही व्हीआयपी खासदारास भेटू शकत नसल्याची नाराजीही काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

मतदारसंघाकडे फिरकत नसल्याबद्दल विरोधकांनी राहुल गांधी यांच्यावर मध्यंतरी जाहीर टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा दौरा आखल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Amethi