हाडांच्या आरोग्यासाठी... 

bone
bone

हेल्थ वर्क 

हाडाचा वापर कोणत्याही वयात कमी झाल्यास हाडे ठिसूळ होऊ शकतात. अगदी टोकाचे उदाहरण घ्यायचे झाल्यास अंतराळवीरांचे घेता येईल. पृथ्वीवर अत्यंत धडधाकट असलेल्या या अंतराळवीरांना अंतराळात वजनरहित अवस्थेत राहावे लागते. त्यामुळे त्यांची हाडे तत्काळ ठिसूळ होऊ लागतात. त्याचप्रमाणे पृथ्वीवर परत आल्यावर नीट व्यायाम न केल्यास छोट्या धक्‍क्‍यांनी ही हाडे मोडू शकतात. वजनरहित अवस्थेत हाडांना आपले स्वतःचे वजनदेखील पेलावे लागत नसल्याने हाडात कॅल्शिअम टिकत नाही. म्हणूनच अंतराळवीरांना अंतराळात स्प्रिंगच्या साहाय्याने व्यायाम करायला लागतो. त्यामुळे कॅल्शिअम थोडेफार टिकायला मदत होते. अंतराळयानात कोणी पडत नाही, म्हणून तिथे ठिसूळपणा वाढतो.

पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणामुळे पडणे मात्र बरे नसते. हाडांच्या वजन पेलण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक ताण आला तरच हाड मोडते. आपण कसे पडतो, हे मात्र नशिबावर अवलंबून असते. जगातली आठ हजार मीटर उंचीची आठ शिखरे चढताना एक प्रसिद्ध गिर्यारोहक अनेक वेळा पडला. मात्र प्रत्येक वेळी सुदैवाने त्याला काही दुखापत झाली नाही. मात्र तो आपल्या गावातली भिंत ओलांडताना पडला आणि त्याचा हात मोडला. पर्वतांवर इतक्‍या वेळा पडूनही कधीही मोडला नाही. त्यामुळे काही वेळा नशीब महत्त्वाचे असते. 

हाडांच्या आरोग्यासाठी हे करा : 
1) सांध्यांच्या सर्व हालचाली योगासनासारखे व्यायाम करून शाबूत ठेवा. 
2) जिममध्ये जाऊन स्नायू बळकट ठेवा. 
3) जमेल तितके उन्हात फिरा. 
4) विविध प्रकारच्या हालचालींची सवय ठेवा. 
5) आहारात पचेल तसे दही व दूध ठेवा. 
6) शरीर वापरण्याची संधी सोडू नका. 

(लेखक क्रीडावैद्यक तज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com