लठ्ठपणा कमी कसा कराल?

लठ्ठपणा कमी कसा कराल?

हेल्थ वर्क
लठ्ठपणाविषयी माहिती देताना ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही,’ अशी सुरवात करावीशी वाटते. कारण एव्हाना सर्व लठ्ठ लोकांची लठ्ठपणाबाबत एक असाध्य रोग अशी समजूत झालेली असते. त्यामुळे गैरसमजुतीचे निराकरण सर्वांत महत्त्वाचे आहे. 

आमच्या घराण्यातच लठ्‌ठपणा आहे - आनुवंशिकतेमुळे एखाद्या वेळी पृष्ठभागावर चरबी असते. स्तन चरबीमुळे मोठे असतात. ढेरपोटे असतात. म्हणजे चरबी कुठे असावी, हे तुमची आनुवंशिकता ठरविते. पण ती किती असावी हे तुमचे खाणे आणि व्यायामातील तफावत ठरविते. 

खाल्ले नाही तरीही वजन वाढते - दिवसात ‘काहीही’ खाल्ले नाही, याचा अर्थ उपोषण केले असा होतो. आणि आपण उपोषण करत नाही. त्यामुळे काहीही खाल्ले तरीही वजन वाढते, म्हणजे हा स्वतःशीच केलेले खोटारडेपणा आहे. आपल्या शरीरात किती उष्मांक गेला आणि त्यापैकी किती बाहेर पडला हे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यामुळे साखरेला शिवत नाही, तरीही वजन वाढते, हा गैरसमज आहे. 

कॅलरीज मोजून खातो, पण वजन आहे तसेच - आपले शरीर एका मर्यादेपर्यंत वजन सांभाळत असते. काबाडकष्ट करणाऱ्या मजुरांचे वजन कमी कमी होत जाऊन ते अदृश्‍य होत नाही. किंवा बकाबका खाणाऱ्या माणसाचे वजन, चारशे, पाचशे किलो असे वाढतही नाही. कुठेतरी वजन स्थिरावते. सामान्यतः २० ते २५ या वयात आपले वजन असते ते खरे वजन. त्यानंतर वाढणारा प्रत्येक ग्रॅम हा चरबीचा असतो. 

योगासने, सूर्यनमस्कार करूनही वजन तसेच - कारण, वजन फक्त दमश्‍वासाच्या व्यायामाने कमी होते. वरील व्यायाम वजन कमी करण्यासाठी उपयोगाचे नाहीत. 

बॅडमिंटन खेळूनही वजन तसेच - घाम येईपर्यंत बॅडमिंटन खेळूनही वजन कमी होत नाही. कारण घाम येण्याचा वजन उतरण्याशी संबंध नाही. बॅडमिंटन हॉलमध्ये वायुविजन बंद असल्याने अंगावर घाम वाळत नाही. त्यामुळे जास्त घाम येतो. एकच स्नायुगट सामान्यपणे अर्ध्या तासाच्या वर एकाच तीव्रतेने जोपर्यंत हालचाल करीत नाही, तोपर्यंत वजन कमी होत नाही.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com