ॲरोबिक्‍सची वैशिष्ट्ये... (डॉ. राजीव शारंगपाणी)

ॲरोबिक्‍सची वैशिष्ट्ये... (डॉ. राजीव शारंगपाणी)

हेल्थ वर्क
ॲरोबिक्‍स व्यायामात नेमके काय होते, असा प्रश्‍न तुम्हाला पडता असेल. ॲरोबिक्‍स व्यायामाची तीव्रता वाढवत नेल्यास शरीराला प्राणवायू अधिक प्रमाणात लागतो. त्यामुळे, श्‍वासोच्छ्वासाची गती आणि खोली वाढते. आता हा प्राणवायू रक्त शोषून घेतो. ते रक्त काम करणाऱ्या स्नायूंना मोठ्या प्रमाणात पुरविण्यासाठी हृदयाचे ठोके वाढतात. तसेच, पोटातील आणि कातडीतील रक्त कमी होते. ते रक्त स्नायूंकडे पाठविले जाते. काही वेळाने शरीराचे अंतर्गत तापमान वाढू लागल्यावर ते कमी करण्यासाठी कातडीची रक्तपुरवठा पुन्हा वाढतो आणि हळूहळू घाम येऊ लागतो. व्यायामाची तीव्रता आणि कातडीखालील चरबी अधिक असल्यास जास्त प्रमाणात घाम येतो. त्यातच खोली बंद असेल, पंखे नसतील तर घामाचे तळे होण्याची फार शक्‍यता असते. 

ॲरोबिक्‍स हा व्यायाम आहे का नाही? ॲरोबिक्‍समध्ये घाम येतो. श्‍वास वाढतो आणि हृदयाचे ठोके वाढतात म्हणजे तो व्यायाम आहे, यात शंका नाही. तेव्हा वरील प्रश्‍नच मूर्खपणाचा आहे, असे कित्येकांना वाटेल. कोणत्याही व्यायाम प्रकारात काही प्रश्‍न विचारायचे असतात. व्यायाम झाल्यावर शरीरात अतिशय सुखकारक संवेदना व्हायला हवी. शरीराचा कोणताही भाग दुखता कामा नये. ॲरोबिक्‍स करणाऱ्या खूप जणांना पाठदुखी, मान दुखणे आणि गुडघे दुखण्याचा त्रास होतो. कारण, ॲरोबिक्‍समध्ये पुढे वाकण्याला अवास्तव महत्त्व दिलेल्या अनेक कॅसेट्‌स प्रचलित आहेत. त्या मानाने मागे वाकणे फारच कमी प्रमाणात आहे. काही हालचाली या आत्यंतिक लवचिकपणाच्या आहेत. त्यामुळे सामान्यपणे नादुरुस्त शरीराच्या लोकांना त्या झेपत नाहीत. प्रत्यक्ष ॲरोबिक्‍समधील कित्येक गोष्टी अनॲरोबिक्‍स म्हणजे प्राणवायू न वापरता केल्या जाणाऱ्या जाणाऱ्या आहेत. अत्यंत झटकन केल्या जाणाऱ्या हालचाली या सर्व अनॲरोबिक्‍स असतात. ॲरोबिक्‍स हा एकदम तंदुरुस्त लोकांनी करण्याचा व्यायाम आहे. तंदुरुस्त होण्यासाठी हा व्यायाम करणे विशेष बरोबर नाही. यात त्या व्यायामाची चूक नाही, तर करणाऱ्याची आहे. 

(पुढील भागात - ॲरोबिक्‍सचे फायदे आणि तोटे)

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com