मुलांना इंटरनेटचे व्यसन लागण्यापूर्वी...

मुलांना इंटरनेटचे व्यसन लागण्यापूर्वी...

आरोग्य मंत्र
मुलांमध्ये खरं तर कुठले संकेतस्थळ (वेबसाइट) पाहायची आणि कोणती नाही, हे समजण्याची कुवत नसते. त्यातून नको त्या साइट्‌स पाहिल्या जाऊ शकतात. त्यातून पुढे मानसिक विकृतीचा जन्म होतो. स्त्री-पुरुष संबंधांबद्दल चुकीची माहिती मिळते. हिंसाचाराचे उदात्तीकरण होऊ लागते. कळत न कळत स्वतःची खासगी माहिती, छायाचित्रे इंटरनेटवर अपलोड केले जातात. त्यातून आणखीनच गुंतागुंत होऊ लागते. विशेषतः वयात येणारी मुले ‘सायबर गुन्हेगारी’च्या कचाट्यात अलगद सापडू शकतात. इंटरनेटचे व्यसन लागलेली अशी मुले आणि त्यांचे भांबावलेले पालक मग बालविकासतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञांकडे येतात. तेव्हा विशिष्ट प्रश्‍नावलीच्या मदतीने त्यांच्या व्यसनाची कारणे व गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर वेगवेगळे उपचार योजले जातात. संयम, निरंतरता व शास्त्रशुद्ध उपचारांनी हे व्यसन सोडताही येते, मात्र व्यसन लागण्यापूर्वीच पालकांनी काही सोपे नियम अमलात आणल्यास मुले आनंदी राहू शकतील.

१.आपल्या स्वतःच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवा, मर्यादा ठेवा. मुले म्हणजे ‘आरसा’ असतात!
२.टीव्ही, लॅपटॉप, मोबाईलचा ‘बेबीसीटर’ म्हणून वापर टाळावा.
३.मुलांना स्वतःचे इंटरनेट, फेसबुक अकाउंट सुरू करून देण्याची घाई टाळा! इंटरनेटवर स्वतःची माहिती, छायाचित्रे टाकणे टाळावे.
४.मुलांना इंटरनेटवरून ‘गेम’ डाउनलोड करण्याची परवानगी देऊ नये. त्यापेक्षा, पालकांनी स्वतः त्यांच्याबरोबर मैदानावर खेळणे उपयुक्त ठरेल.
५.संगणक घरात सहज दिसेल, अशा ठिकाणी ठेवावा.
६.इंटरनेटच्या व्यसनाची लक्षणे जाणवली तर वाट पाहू नका. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

(उद्याच्या अंकात : टेक्‍स्टीज भाषेचा प्रभाव)
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com