मानसिक आजार बरा होऊ शकतो

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

पुणे - जनरल प्रॅक्‍टिशनर्स आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये स्क्रिझोफेनियासह इतर मानसिक आजारांचे अचूक निदान आणि पायाभूत उपचार करण्याची क्षमता निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार राज्यात
हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

जागतिक स्क्रिझोफेनिया जागृती दिन बुधवारी (ता. 24) आहे. त्यानिमित्त 'स्क्रिझोफेनिया अवेअरनेस असोसिएशन'चे उपाध्यक्ष डॉ. अनिल वर्तक यांनी 'सकाळ'शी बोलताना ही माहिती दिली.

डॉ. वर्तक म्हणाले, ''मानसिक आजारांचे प्रमाण पाच ते सहा टक्के आहे. त्या तुलनेत मनोविकारतज्ज्ञांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे मानसिक आजारांचे लवकर निदान होणारी व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून मानसिक आजारांचे रोगनिदान आणि पायाभूत उपचाराचे प्रशिक्षण सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि खासगी रुग्णसेवा करणाऱ्या जनरल प्रॅक्‍टिशनर्सला देण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या नोव्हेंबरपासून अभ्यासक्रम सुरू होणार आहे.''

जागतिक आरोग्य संघटनेनेही या संकल्पनेला प्रोत्साहन दिले आहे. आपल्या देशात ऍलोपॅथिक, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्‍टरांची संख्या मोठी आहे. त्यांना प्रशिक्षण दिल्यास मानसिक आजारांच्या निदानात होणारा उशीर कमी करता येईल. त्यातील गुंतागुंतीच्या, आव्हानात्मक रुग्णांना पुढील सल्ल्यासाठी मनोविकारतज्ज्ञांकडे पाठविण्याची सुविधा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ''जागतिक आरोग्य संघटनेने प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी माहिती पुस्तिकाही तयार केली आहे. त्या आधारावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमातही मानसिक आजाराच्या रोगनिदानाचे सविस्तर विवेचन करावे, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय वैद्यक परिषदेला केली आहे. त्यातून पुरेशी माहिती विद्यार्थ्यांना मिळेल.''

डॉक्‍टरांना प्रशिक्षणाची गरज का?
आपल्या देशात मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. बहुसंख्य वेळा हे रुग्ण शारीरिक आजाराच्या तक्रारी घेऊन जनरल प्रॅक्‍टिशनर्सकडे जातात; पण त्यांच्या विकाराचे मूळ मानसिक असते. हे निदान लवकर झाल्यास रुग्णावर प्रभावी उपचार करता येतील.

डॉक्‍टरांच्या प्रशिक्षणाचे फायदे

  • औषधोपचार, सल्ला स्वस्त असेल
  • निदानाचा वेळ वाचेल
  • सामाजिक भीती त्यातून कमी होईल
Web Title: Article about Mental Health