अनावश्यक केस : कारणे व उपचार

Unnecessary-Hair
Unnecessary-Hair

आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ
शरीराच्या संरक्षणासाठी प्रत्येकाच्या त्वचेवर बारीक लव असते. परंतु काही वेळा या केसांची वाढ होऊ लागते. तसेच काही स्त्रियांमध्ये अनावश्यक ठिकाणी अशा केसांची वाढ होऊ लागते. चेहऱ्यावर असे केस वाढल्यास सौंदर्यात बाधा येते. बाहेर वावरताना एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो.

शरीराच्या इतर झाकलेल्या भागावर उदा. पोट, पाठ, छातीवर चेहऱ्याप्रमाणेच राठ केसांची वाढ होते. काही व्यक्तींना जन्मजातच केस जास्त असतात. यात आनुवंशिकतेचा भाग असतो. मात्र वयात येताना अनावश्यक केस उगवायला लागल्यास शरीरातील संप्रेरकांचे प्रमाण रक्ततपासणी करून पडताळून पाहणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे, अंडाशयाला सूज असल्यास सोनोग्राफी करणे गरजेचे असते. अंत:स्रावातील असंतुलनामुळे वजन वाढणे, चेहऱ्यावर मुरुमे येणे, डोक्यातील केस विरळ होणे, मान, काख अथवा जांघेतील त्वचा जाडसर व काळी होणे, स्ट्रेच मार्क पडणे अशी लक्षणे दिसतात. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे (पीसीओडी व मेटॅबॉलिक सिंड्रोमचे प्रमाण वाढलेले आढळते. याचे जसे त्वचा व केसावर दुष्परिणाम होतात, तसेच परिणाम हृदय व आतील अवयवांवर होऊ शकतात.) काही वेळा त्वचेवर उगवणारे अनावश्यक केस हे अशा मोठ्या आजाराचे प्राथमिक लक्षण असू शकते. रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये केसांची वाढ झाली तर त्याकडे अतिशय गांभीर्याने पाहणे गरजेचे असते. काही वेळा ते अंडाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्यामुळे ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेऊन तपासण्या करणे गरजेचे असते. याकडे फक्त सौंदर्याच्या मापदंडातून पाहणे चुकीचे आहे. संप्रेरकांमधील असंतुलनाबरोबरच इतर आजारांसाठी घेण्यात येणाऱ्या काही औषधांमुळे अथवा डोक्यावरील केसांच्या वाढीसाठी वापरण्यात येणाऱ्या तेलांमुळेही काही वेळा अनावश्यक केसांची वाढ होऊ शकते. त्यावरील उपचारांबाबत पुढील भागात पाहूया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com