तुटलेली हाडे न जुळण्याची कारणे व उपाय

bone
bone

आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ
मुख्यतः अपघातामुळे, पडल्यामुळे अथवा मार लागल्यामुळे हाडे तुटल्याचे आढळून येते. त्याला फॅक्‍चर असे म्हणतात. अत्याधुनिक उपचारांमुळे बहुतांशी रुग्णांमध्ये हाडे जुळून येतात. ती भरून येण्यामध्ये काही अडथळा येत नाही. हाड तुटल्यानंतर केलेल्या उपचारामुळे हाडाची टोके एकमेकांच्या जवळ आणून योग्य अलाईनमेंटमध्ये बसवतात. त्यामुळे हाडामधील पेशी नव्याने तयार होऊन हाडे जुळण्याची प्रक्रिया घडते. मात्र काही वेळा उत्तम उपचार करून, शस्त्रक्रिया व्यवस्थित होऊनही तुटलेली हाडे जुळली जात नाहीत, असे निदर्शनास येते. काही वेळा काही धोकादायक घटकांमुळे ही तुटलेली हाडे जुळून येत नाहीत. त्याला ‘नॉन युनियन ऑफ फ्रॅक्‍चर’ असे संबोधले जाते. काही वेळा तुटलेली हाडे जुळून येण्याची प्रक्रिया मंदावते व दीर्घकाळ लागतो तेव्हा त्याला ‘डिलेड युनियन’ असे म्हटले जाते. 
तुटलेली हाडे कशी जुळून येतात व त्या प्रक्रियांमध्ये कोणते घटक कारणीभूत असतात ते आपण पाहू या. 

१.    फॅक्‍चरच्या ठिकाणी असणारी स्थिरता (स्टॅबिलिटी) -
    तुटलेल्या हाडाचे फ्रॅक्‍चर जुळण्यासाठी सर्व प्रकारच्या पद्धतीमध्ये एक महत्त्वाचा नियम असतो, तो म्हणजे तुटलेल्या हाडाचे भाग अथवा टोके पूर्वस्थितीमध्ये आणून जोडणे.  फ्रॅक्चरचा भाग हालणार नाही, स्थिर राहील अशा प्रकारे पूर्ण जुळेपर्यंत ठेवणे. काही फॅक्‍चर जोडण्यासाठी प्लॅस्टर अथवा कास्ट लावले जाते. काही फॅक्‍चर जोडण्यासाठी भूल देऊन शस्त्रक्रिया करून प्लेट, स्क्रू, फ्रेम, रॉड वापरून हाडे स्थिर राहण्यासाठी फिक्‍स करावी लागतात. 

२.    रक्तपुरवठा -
    फ्रॅक्‍चर झालेल्या ठिकाणी तुटलेली हाडे जुळण्यासाठी पुरेसा व योग्य रक्तपुरवठा होणे आवश्‍यक असते. रक्तामधील ऑक्‍सिजन, हाडे जुळून येण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या पेशी, जुळून येण्यासाठी आवश्‍यक असणारे ग्रोथ फॅक्‍टर, या घटकामुळे हाडे भरून येण्यास मदत होते.   
    पुरेशा रक्तपुरवठ्यामुळे नैसर्गिकपणे तुटलेल्या हाडांना भरून येण्याच्या कालावधीत हे सर्व घडून येते. 

३.    पोषक अन्नघटक -
    तुटलेली हाडे जुळून येण्यासाठी संतुलित, पोषक आहार घटकांचाही परिणाम होत असतो. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, क आणि ड जीवनसत्त्वे हे घटक महत्त्वाचे असतात. काही  वेळा आहाराबरोबर औषधांच्या स्वरूपातही या घटकांचा वापर केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com