गर्भारपणातील यकृताची काळजी

pregnancy
pregnancy

आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी - धडफळे, यकृततज्ज्ञ
कित्येक वेळा यकृताचा आजार असताना गर्भधारणा होते. उदाहरणार्थ, ‘हेपॅटायटिस बी’ आणि ‘सी’ची लागण झालेल्या महिलेस गर्भारधारणा होते किंवा पूर्वीचा क्रोनिक लिव्हरचा आजार असताना गर्भधारणा होते. (उदा. ऑटोइम्मलिन लिव्हर डिसीज) अशा वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि यकृततज्ज्ञांच्या सल्लाने उपचार करणे आवश्‍यक असते. 

हेपॅटायटिस बी आणि गरोदरपण -
    यकृत तज्ज्ञांच्या सल्ल्याने हेपॅटायटिसचा योग्य उपचार करणे आवश्‍यक आहे. 
    तसेच बाळास जन्मतः लस व इम्युनोग्लोबिन देणे गरजेचे आहे. 

गर्भारपणात यकृताची कशी काळजी घेता येईल
१)     प्रत्येक गरोदर स्त्रीने हिपॅटायटिस बी, सी, एचआयव्हीची तपासणी करणे आवश्‍यक आहे. 
२)     ‘हिपॅटायटिस बी’ची लस गर्भधारणेपूर्वी देणे आवश्‍यक आहे. 
३)     गर्भारपणात स्त्रीरोगतज्ज्ञांकडे नाव नोंदविणे व नियमितपणे तपासणी करणे आवश्‍यक आहे. 
४)     पोटात दुखू लागल्यास, उलट्यांचे प्रमाण वाढल्यास, अंग खाजू लागल्यास किंवा काविळीची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. 
५)     बाहेरचे उघड्यावरचे, माश्‍या बसलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे. जेणेकरून साथीची कावीळ होणार नाही. 
६)     गरोदरपणात यकृताची रक्तचाचणी दर दोन-तीन महिन्यांनी करणे आवश्‍यक आहे. 
७)      पूर्वीचा यकृताचा आजार असल्यास यकृत तज्ज्ञांकडेही नियमितपणे जाणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com