लहान मुलांमधील यकृताचे आजार

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी - धडफळे, यकृततज्ज्ञ
लहान मुलांमधील यकृताचे आजार बऱ्याच वेळेस दुर्लक्षित राहतात. भारतात हे प्रमाण पुष्कळ आहे. बरेचदा या आजारांबद्दल असलेली उपेक्षा, योग्य उपचारपद्धतींचा अभाव किंवा आर्थिक दडपणामुळे या मुलांना योग्य उपचारांपासून वंचित राहावे लागते. काही प्रसंगी मृत्यूला सामोरे जावे लागते.

या आजारांचे अचूक निदान आणि उपचार भारतामध्ये मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत. अनेक दानशूर व्यक्तींमुळे अगदी यकृतरोपण शस्त्रक्रियेपर्यंतची उपचारपद्धती अगदी रास्त दरात उपलब्ध आहे. 

यकृताच्या आजाराची लहान मुलांमधील मुख्य लक्षणे अशी आहे. 
१) भूक न लागणे, २) पोट मोठे होणे, ३) कावीळ होणे, ४) शरीराची वाढ खुंटणे, ५) चिडचिडेपणा वाढणे, ६) झोप नीट नसणे, ७) रक्ताची उलटी होणे किंवा शौचातून रक्त जाणे, ८) कुपोषणाची लक्षणे दिसू लागणे.

लहान मुलांमधील यकृताच्या आजारांचे वर्गीकरण 
लहान मुलांमधील यकृताचे आजार मुख्यत्वे तीनचार प्रकारांमध्ये विभागले जातात. 
१) पित्त साचल्यामुळे होणारे आजार : यामध्ये पित्तनलिका जन्मतः नीट तयार न झाल्यामुळे यकृताचा आजार उद्‌भवतो. यालाच शास्त्रीय भाषेमध्ये बिलियरी अट्रेसिया (Biliary Atresia) असे संबोधतात. बाळाची शी पांढरट होत असल्यास लगेचच डॉक्‍टरांचा सल्ला घेणे जरुरी आहे. प्रोग्रेसिव्ह फॅमिलियल इंट्राहेपॅटिक कोलेस्टॅसिस या आजारात कावीळ वाढत जाते. 

२) ॲटोईम्युन लिव्हर डिसीज : प्रौढांप्रमाणे लहान मुलांमध्येही हा आजार आढळतो. सुरवातीच्या काळात यकृताच्या रक्त तपासणीमध्ये बदल आढळतो. वेळेवर औषधोपचार केल्यास यकृताचा सिऱ्हॉसिस टाळता येऊ शकतो. 

३) मेटाबॉलिक लिव्हर डिसीज, विल्सन्स डिसीज : यकृतात तांब्याचे प्रमाण वाढल्याने हा आजार होतो. तो आनुवंशिक आहे. त्यामुळेच एका मुलास आजार असल्यास बाकीच्या भावंडांचीही योग्य तपासणी करणे आवश्‍यक आहे. या आजाराचे निदान रक्त, लघवी, डोळे तपासून करता येते, तसेच यकृताच्या बायोप्सीत त्यातील तांब्याचे प्रमाण नोंदवले जाते. लहान वयात अथवा तरुणपणी लिव्हरचा आजार झाल्यास हा आजार आहे की नाही, हे पडताळणे आवश्‍यक आहे. ग्लुकोजेन स्टोरेज डिसीजसारखे असेच अजूनही आजार क्वचितप्रसंगी आढळतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shital mahajani dhadphale all is well sakal pune today