ऑल इंडिया आणि अभिमत प्रवेशाचे नियम

Career
Career

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
देशभरातील एमबीबीएस व बीडीएस शाखेतील शासकीय महाविद्यालयातील १५ टक्के ऑल इंडिया कोट्यातील व देशभरातील अभिमत व सेंट्रल युनिव्हर्सिटीतील प्रवेशाची प्रक्रिया www.mcc.nic.in संकेतस्थळावर सुरू असून, पहिल्या फेरीसाठी रजिस्ट्रेशन २४ जून रोजी, पेमेंट सुविधा २५ जून व पसंतीक्रम लॉक करणे २५ जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध आहे.

प्रथम भाग घ्यावा का, कोणी घ्यावा याबाबत मागील लेखामध्ये सविस्तर नमूद केले आहे. आता निर्णय झाला तर ज्यांना १५ टक्के मध्ये भाग घ्यावयाचा आहे, त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन शुल्क हे खुल्या गटाकरीता १ हजार, तर राखीव गटासाठी ५०० रुपये असून सिक्‍युरिटी डिपॉझिट अनुक्रमे १० व ५ हजार रुपये आहे. तर अभिमत विद्यापीठासाठी रजिस्ट्रेशन शुल्क ५ हजार रुपये व रिफंडेबल म्हणजे परतीचे २ लाख रुपये अनामत रक्कम असून ते भरल्यानंतरच रजिस्ट्रेशन होते. नियम तोडल्यास डिपॉझिट जप्त होते. रजिस्ट्रेशन फक्त एकदाच करावे लागते. 

ऑप्शन भरताना - अभिमतमध्ये आपल्या आवडीनुसार व आर्थिक क्षमता तपासूनच आवश्‍यक तेवढे पर्याय तेही पहिला उच्च व त्यानंतरचे सर्व उतरत्या क्रमाने मांडणी करून भरावेत. चॉइस भरणे व लॉकिंग करण्याची अंतिम मुदत २५ जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत असून आपण चॉइस लॉक न केल्यास ते ऑटो लॉकिंग होतात. ५ टक्‍क्‍यांसाठी दोन फेऱ्या व त्यानंतर शिल्लक राहिलेल्या जादा जागा राज्यांकडे वर्ग होतात.

अभिमतसाठी तीन फेऱ्या असून त्यानंतर उर्वरित जागा संबंधित संस्थांकडे वर्ग होतात. रजिस्ट्रेशन फक्त १५ टक्‍क्‍यांसाठी किंवा दोन्हीसाठीही करता येते. पसंतीक्रमानंतर जागेचे वाटप एकत्रितपणे होते. 

प्रवेश प्रक्रिया - पहिल्या फेरीसाठीचे जागावाटप २७ जून रोजी जाहीर होणार असून २८ जून ते ३ जुलै २०१९ पर्यंत प्रवेश घ्यावयाचे आहेत. दोन्हीही मार्गातून होणाऱ्या प्रवेशासाठीचे नियम समान आहेत. 

पर्याय १ - पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला, तो स्वीकारला, संस्थेत जाऊन फी व कागदपत्रे देऊन तो घेतला, त्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी बेटरमेंटला जाण्याचा येस, नो पर्याय उपलब्ध आहे. आपण बेटरमेंट पर्याय निवडला, तरीही दुसऱ्या फेरीसाठी पात्र असता. बेटरमेंट न निवडता मिळालेला प्रवेशही कायम करू शकतो. 

पर्याय २ - प्रवेश मिळाला, मला तो घ्यावयाचा नाही, आपणास फ्री एक्‍झिट पर्याय आहे. प्रवेश मिळाला, आपण संस्थेत गेलोच नाही, तरीही फ्री एक्‍झिट होते. रिपोर्ट करण्याची आवश्‍यकता नाही. दंडात्मक कार्यवाही नाही.

प्रवेशाची दुसरी फेरी - पात्र कोण?
ज्यांना प्रवेश मिळाला नाही, असे सर्व जण दुसऱ्या फेरीसाठी पात्र असतात. ज्यांना प्रवेश मिळाला, नाकारला, फ्री एक्‍झिट झाली असेही सर्वजण यामध्ये पात्र आहेत.

प्रवेश मिळाला, स्वीकारला, बेटरमेंट पर्याय निवडला असे सर्वजण. ज्यांनी पहिल्या फेरीत रजिस्ट्रेशन केले नाही, असे नव्याने रजिस्ट्रेशन करून भाग घेऊ शकणारे सर्व जण.

दुसरी फेरी पद्धत
पहिल्या फेरीच्या पसंतीक्रमाचा काहीही संबंध नाही. सर्व पसंतीक्रम नव्याने भरावे लागतात, त्यानंतर जागावाटप जाहीर होईल.

पर्याय १ - प्रवेश नव्याने मिळाला, तो स्वीकारला, संस्थेत जाऊन प्रवेश घेणे. आता या फेरीत बेटरमेंट पर्याय नाही. सदरचा प्रवेश अंतिम आहे. परंतु प्रवेश मिळूनही तो घेतला नाही, तर अनामत रक्कम जप्त होते.

पर्याय २ - पहिल्याच फेरीतील प्रवेश मिळाला, बेटरमेंट झालीच नाही, तो घ्यावाच लागतो. नाही घेतल्यास अनामत रक्कम जप्त होते. प्रवेश मिळालाच नाही, तर मात्र आपण पुढील फेरीसाठी पात्र असतो. थोडक्‍यात, यापुढे प्रवेश मिळाला, की तो स्वीकारणे बंधनकारक असते. न स्वीकारल्यास दंडात्मक कारवाई अशी पद्धत आहे.
अनामत रक्कम नियम

प्रवेश मिळाला, अनामत रक्कम दोन लाख संस्थेकडे फीमध्ये जमा होते.   
प्रवेश मिळाला, स्वीकारला  नाही, तर फक्त फ्री एक्‍झिट. (पहिली फेरी वगळून) अनामत रक्कम जप्त होते.

प्रवेश शेवटपर्यंत मिळाला नाही, तर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर दोन लाख रुपये अनामत रक्कम आपल्या बॅंक खात्यात जमा होते. वेळापत्रकातील बदलाकडे सतत लक्ष ठेवावे व संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com