किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना पात्रता

Career
Career

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
शास्त्रीय संशोधनात अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या संशोधन व विकासासाठी करणे, कमी वयातच त्यांना संशोधनाची संधी देऊन त्यांच्यामधील जिज्ञासा, निर्मिती क्षमता वाढविणे व त्याद्वारे तरुण शास्त्रज्ञ निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेवून मूलभूत विज्ञानात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना राबविली जाते.

www.kvpy.iisc.ernet.in या संकेतस्थळावर केव्हीपीवाय-२०१९ परीक्षेचे ऑनलाइन अर्ज २० ऑगस्टपर्यंत उपलब्ध असून, अभिक्षमता चाचणी देशभरातील १११ शहरांमध्ये एकावेळी ३ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

अॅप्टिट्यूड टेस्ट पात्रता - चालू शैक्षणिक वर्षात सध्या अकरावी किंवा बारावीमध्ये पीसीएमबी अथवा त्यापैकी कोणतेही तीन विषय घेतलेला विद्यार्थी तसेच प्रथमवर्ष पदवीपूर्व बेसिक सायन्सेसमधील अभ्यासक्रमात शिकत असलेला विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतो.

१. स्ट्रीम एसए : २०१९ शैक्षणिक वर्षाच्या दरम्यान अकरावी विज्ञान शाखेत शिकत असलेला सध्याचा विद्यार्थी व दहावी बोर्डात गणित विज्ञान विषयात एकत्रितरीत्या खुल्या गटासाठी ७५ टक्के व राखीव गटासाठी ६५ टक्के गुण प्राप्त केलेला विद्यार्थी पात्र आहे. या मार्गातून निवडलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे बारावी परीक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण मिळविल्यानंतर (५० टक्के राखीव गटासाठी) व २०२१-२२ मध्ये बेसिक सायन्सेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यावेतन दिले जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये शिकत असताना देशभरातील विभागीय व राष्ट्रीय कॅम्पसाठी केव्हीपीवायच्या खर्चाने निमंत्रित केले जाते.

२. स्ट्रीम-एसएक्स : सध्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० दरम्यान बारावी विज्ञान शाखेत शिकत असणारा व बेसिक सायन्सेसमधील २०२०-२१मधील अभ्यासक्रमासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये वरीलप्रमाणेच गुण मिळविणे आवश्यक आहे. फेलोशिप घेण्याआधी बारावी परीक्षेतही वरीलप्रमाणेच गुण मिळवणे आवश्यक आहे.

३. स्ट्रीम एसबी : सध्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० दरम्यान प्रथम वर्ष पदवीपूर्व बेसिक सायन्सेसमधील अभ्यासक्रमात शिकत असणारा विद्यार्थी व बारावी सायन्स विषयात (कमीत कमी खुल्या गटासाठी ६० टक्के व राखीव गटासाठी ५० टक्के) गुण प्राप्त करणारा विद्यार्थी पात्र आहे. विद्यावेतन पात्रतेसाठी प्रथम वर्षाच्या अंतिम परीक्षेत देखील वरीलप्रमाणे गुण मिळवणे आवश्यक आहे.

अभिक्षमता चाचणी - अभ्यासक्रम - अॅप्टीट्यूड टेस्टसाठी निर्धारीत अभ्यासक्रम नाही. विद्यार्थ्याच्या विषयाची आकलनक्षमता, समजून घेण्याच्या आणि विश्लेषणात्मक क्षमतेचे परीक्षण करणे हा परीक्षेचा मुख्य उद्देश असतो. तथापि विद्यार्थ्याची तपासणी दहावी, बारावी व प्रथम वर्षापर्यंतच्या अभ्यासक्रमासाठी केली जाते. एकंदरीत संकेतस्थळावर २००९ पासून २०१८पर्यंतच्या सर्व स्ट्रीमच्या प्रश्नपत्रिका व की आन्सर्स उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्याचा प्रथम अभ्यास करावा. संकेतस्थळावर मॉक टेस्टसुद्धा उपलब्ध करून दिली जाते. केव्हीपीवाय २०१९ अभिक्षमता चाचणीतून निवडक व पात्र विद्यार्थ्यांना निमंत्रित करून मुलाखत घेतली जाते व त्यानंतर फेलोशिपसाठी अंतिम निवड केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com