बीएएमएस, बीएचएमएस - दुसऱ्या फेरीचे प्रवेश

Career
Career

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, करिअर मार्गदर्शक
आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकअंतर्गत असणाऱ्या राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयातील बीएएमएस, बीएचएमएस प्रवेशासाठीच्या दुसऱ्या फेरीत मिळालेल्या प्रवेशाची यादी www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून, प्रवेश स्वीकारण्याची, तसेच आपल्या इच्छेनुसार स्टेट्स रिटेन्शन फॉर्म देण्याची मुदत १८ सप्टेंबर २०१९ रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे.

यंदा प्रथमच राज्यातील एमबीबीएस व बीडीएस, तसेच बीएएमएस व बीएचएमएस आणि बीपीटीएच व इतर शाखांच्या प्रवेशासाठी या तीन मार्गांतून स्वतंत्रपणे पसंतीक्रम नोंदवून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यापैकी एमबीबीएस, बीडीएस प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. बीपीटीएच, बीओटीएच व इतर शाखांच्या प्रवेशासाठीची दुसरी फेरी जाहीर झालेली असून, प्रवेश घेण्याची व आवश्यकतेनुसार स्टेट्स रिटेन्शन फॉर्म भरून देण्याची अंतिम मुदत २० सप्टेंबर २०१९ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे. 

प्रथमच नव्याने प्रवेश मिळाला असल्यास : पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नव्हता, परंतु दुसऱ्या फेरीत नव्याने प्रथमच प्रवेश मिळाला, असेल अशा उमेदवारांना सदरचा प्रवेश घ्यावाच लागतो. तो घेतला नाही, तर संबंधित मार्गातील पुढील प्रवेश प्रक्रियेतून आपण बाद होतो, याची नोंद घ्यावी.
. प्रथम संबंधित महाविद्यालयाकडे संपर्क साधून डीडी रक्कम, डीडी कोणाच्या नावे तसेच कोठे देय असावा, ही माहिती घ्यावी. अनुसूचित जाती व जमातीसाठी सर्व शैक्षणिक शुल्क माफ व ओबीसी आणि एसईबीसी साठी ५० टक्के शुल्क माफी असल्यामुळे संपर्क साधताना आपला प्रवेशाचा प्रवर्ग सांगावा व त्याप्रमाणे डीडी काढावा.
. आपणास नव्याने प्रवेश मिळाला, परंतु इतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्यामुळे किंवा ‘नीट’ पुन्हा देण्यासाठी आपणास तो नको असेल, तर कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. आपण आपोआप पुढील प्रवेश प्रक्रियेतून बाद होतो. 
सर्व मूळ कागदपत्रे, झेरॉक्स संच व डीडी देऊन प्रवेशाची कार्यवाही करावी व मूळ कागदपत्रांची रिसीट घ्यावी. 

बेटरमेंट झाली असल्यास : पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला, त्यानंतर रिटेन्शन न देता बेटरमेंट पर्याय निवडला व दुसऱ्या फेरीत नवीन ठिकाणी उच्च पसंतीक्रमाचा प्रवेश मिळाला, अशा वेळी प्रथम पूर्वीच्या संस्थेत जाऊन मूळ कागदपत्रे, भरलेले शुल्क परत घ्यावे. 
बेटरमेंट झाली, याचाच अर्थ पूर्वीचा प्रवेश आपोआप रद्द होतो. नवीन ठिकाणी जाऊन प्रवेश घ्यावाच लागतो. याची गांभीर्याने नोंद घ्यावी. 
. पूर्वी पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला होता, दुसऱ्या फेरीत बेटरमेंट मिळाली, परंतु काही कारणामुळे सदरचा प्रवेश नको आहे, अशा वेळी आपण पूर्वीच्या ठिकाणी जाऊन आपली कागदपत्रे, फी परत घ्यावी व नवीन ठिकाणी प्रवेशासाठी जाऊ नये. म्हणजेच आपण आपोआप प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडता.

नो चेंज : पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला, दुसऱ्या फेरीत बदल झाला नाही, तोच प्रवेश राहिला, अशा वेळी आपणास काहीही करण्याची आवश्यकता नाही, आपण पुढील फेरीसाठी पात्र असता. मात्र आपणास आपल्या इच्छेनुसार रिटेन्शन द्यावयाचे असेल तर मुदतीत देणे आवश्यक आहे. 

चॉइस नॉट अव्हेलेबल : दोन्ही फेरीत प्रवेश मिळाला नाही, तर पुढील फेरीची प्रतीक्षा करावी. पहिल्या फेरीत शासकीय बीएएमएस सुमारे ५३ टक्के, खासगी बीएएमएस सुमारे ४१ टक्के व बीएचएमएस ६० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला, त्यामुळे अनुक्रमे ६९८, ११६५ व २२६९ जागा शिल्लक राहिल्या. 

आता या सर्व जागांचे वाटप दुसऱ्या फेरीत झालेले आहे, यामधून तिसऱ्या फेरीसाठी किती जागा उपलब्ध राहतील यावरती पुढील फेरीत आपणास काय उपलब्ध होईल हे निश्चित होईल. बीएएमएस साठी सुमारे १५ ते २० टक्के व बीएचएमएससाठी ४० टक्के जागा राहू शकतील असा अंदाज आहे. 

पहिल्या फेरीनंतर जागा राहण्याचे कारण अनेक विद्यार्थ्यांना एमबीबीएस, बीडीएस प्रवेश प्राप्त झाले, तसेच अनेकजण नीट पुन्हा देण्याचा प्रयत्न करतात.

सध्या प्रवेश मिळालेला आहे, रिटेन्शन फॉर्म भरून देणे बंधनकारक नाही.  बीएचएमएसवरून खासगी बीएएमएस प्रवेश तसेच खासगी बीएएमएस वरून शासकीय बीएएमएस प्रवेश मिळेल का, याचा विचार करून रिटेन्शन देण्याबाबतचा निर्णय घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com