कानमंत्र : ‘टिपटॉप’ दिसण्यासाठी

आपण ‘टिपटॉप’ दिसावं, इतरांमध्ये उठून दिसावं, इंप्रेशन पडावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्यासाठी काही सोपे कानमंत्र आपण लक्षात घेऊ या.
beautiful look
beautiful looksakal

आपण ‘टिपटॉप’ दिसावं, इतरांमध्ये उठून दिसावं, इंप्रेशन पडावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्यासाठी काही सोपे कानमंत्र आपण लक्षात घेऊ या.

तुमचं व्यक्तिमत्त्व लक्षात घ्या

कपड्यांची योग्य निवड करण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्त्व लक्षात घेणं सर्वांत महत्त्वाचं. तुमची शारीरिक ठेवण, वर्ण, उंची, कंफर्टबाबतची सवय या गोष्टी लक्षात घ्या आणि मगच कपड्यांची निवड करा.

आत्मविश्वासानं वावरा

कपडे कसेही असले, तरी तुमचा वावर कसा असतो, त्यावरसुद्धा त्यांचं इंप्रेशन ठरत असतं. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कोणत्याही कपड्यांमध्ये, स्टाइलमध्ये उत्तमच असला पाहिजे आणि आपण जे परिधान केलं आहे ते उत्तमच आहे असं स्वतःलाच समजावत कपडे ‘कॅरी’ करा.

प्रयोग करत राहा

तुम्ही जितके प्रयोग करत राहाल, तितकं तुमचं स्वतःचं ‘स्टाइल स्टेटमेंट’ नक्की काय आहे ते तुम्हाला परफेक्ट पद्धतीनं सापडत जाईल. त्यामुळे प्रयोगशील राहिलंच पाहिजे. मात्र, सतत प्रयोग करणंही टाळा आणि विचित्र प्रयोग हे स्वतःचं ‘स्टाइल स्टेटमेंट’ बनवू नका.

कपाटात काय आहे?

तुम्हाला तुमच्या कपड्यांच्या कपाटात काय काय आहे हे माहीत आहे का? अनेकदा एखादा उत्तम शर्ट इतका खाली जातो, की त्याची आठवणच राहत नाही. खूप वेळानं आठवण येईपर्यंत त्याचा ‘रिलेव्हन्स’ कमी झालेला असतो. त्यामुळे तुमच्या कपाटात काय काय आहे हे सतत तुमच्या डोक्यात असू द्या. त्यामुळे बरोब्बर वेळेला बरोब्बर ड्रेस तुम्ही निवडू शकाल.

किंमत नव्हे; ‘चॉइस’ महत्त्वाचा

कपड्यांची किंमत नव्हे, तर कोणत्या प्रकारच्या कपड्यांचा ‘चॉइस’ केला जातो हे फॅशनच्या जगतात महत्त्वाचं असतं. खूप महाग कपडे घेणं परवडत नाही म्हणून अजिबात हळहळत बसू नका. त्यापेक्षा अगदी रास्त किंमतीतल्या कपड्यांचा वापर करूनसुद्धा स्वतःला कसं उत्तम प्रकारे ‘प्रेझेंट’ करता येईल, याचा विचार करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com