SUNDAY स्पेशल : अपहरण, खंडणी अन्‌ खून

Crime
Crime

खंडणी उकळून सुखासीनतेचे जीवन जगण्याची लालसा, पैसे मिळवून ऐषाराम करण्याची वाढती वृत्ती, यामुळे पुणे आणि परिसरात अपहरणाचे प्रकार वाढत आहेत. प्रसंगी जिवावर उठण्याचे प्रकारही घडतात. पोलिस तपास लावतात. पण हे प्रकार रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणेची गरज आहे, हेच खरे.

उद्योजक, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्य विक्रेते किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे अपहरण केले जाते. त्यानंतर खंडणीस विरोध होताच संबंधित व्यक्तीचा खून केला जातो. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात खंडणीसाठी दोघांचे खून झाल्याच्या घटना ताज्या आहेत. याच पद्धतीने कित्येकांना खंडणीसाठी ठार मारण्याची धमकीही दिली जाते. असे प्रकार वाढत असून, त्याचा फटका उद्योग, बांधकाम व्यावसायिक क्षेत्राला बसत आहे. पोलिसांकडून घटनेचा तत्काळ तपास होतो. मात्र, असे प्रकार टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची अद्याप प्रतीक्षा आहे.

औद्योगिक व आयटी क्षेत्र आणि विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांचे जाळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यामध्ये विस्तारलेय. पिंपरी-चिंचवडमध्ये तर छोट्या-मोठ्या स्वरूपातील तब्बल १२ हजार उद्योगधंदे आहेत. त्याचबरोबर चाकण, तळेगाव दाभाडे औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांची संख्याही लक्षणीय आहे. पुणे शहर, उपनगर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील आर्थिक उलाढाल पाहून काही वर्षांपासून गुन्हेगार, गुन्हेगारांच्या टोळ्या त्याकडे वळल्या आहेत. कथित माथाडीसह अनेक संघटना, त्यांचे कार्यकर्ते आणि किरकोळ गुन्हेगारही खंडणी मागण्यात आघाडीवर आहेत. विशेषतः हा प्रकार केवळ खंडणीपुरता मर्यादित न राहता तो थेट एखाद्याच्या जिवावरच उठू लागल्याची सद्यःस्थिती आहे. उद्योजक, व्यावसायिक भीतीपोटी पोलिसांकडे येत नाहीत. त्याचाच गैरफायदा घेऊन असे प्रकार वाढू लागले आहेत. हे चित्र दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पोलिस अशा घटनांचा गांभीर्याने तपास करतात, आरोपींना अटकही होते. मात्र, कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. 

तरुणांची गुन्हेगारी ‘इझी मनी’साठी
औद्योगिक पट्ट्यात खंडणीसाठी सराईत गुन्हेगार, त्यांच्या टोळ्या सक्रिय आहेत. शहरी भागातील खंडणीच्या घटनांमध्ये काही अपवाद वगळता सराईत गुन्हेगारांऐवजी झटपट श्रीमंत होण्यासाठी धडपडणारे तरुण, किरकोळ गुन्हेगार आणि बेरोजगार तरुणांचाच सर्वाधिक समावेश असल्याची सद्यःस्थिती आहे. मार्केट यार्ड, भवानी पेठेतील अपहरणाच्या प्रकरणातून पोलिसांनी दोघांचे जीव वाचविले. त्यातील अटक केलेल्या आरोपींमध्ये बहुतांश जणांना गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नव्हती.

घटना १ - चिमुरड्याला सोडले निर्जनस्थळी
कोंढव्यातील वडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात खेळणाऱ्या दोन वर्षांच्या मुलाचे शनिवार, २५ मार्च २०१९ रोजी अनोळखी व्यक्तीने अपहरण केले. अपहरणकर्त्याने मुलाच्या वडिलांकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. दरम्यान, आरोपीने पोलिसांच्या भीतीने मुलाला निर्जनस्थळी सोडून पलायन केले. अवघ्या ११ तासांत मुलाची सुखरूप सुटका झाली. 

घटना २ - सगळे काही पैशासाठी...
चंदन शेवानी या व्यावसायिकाचे ४ जानेवारी २०२० रोजी पुण्यातून खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. त्यानंतर साताऱ्यातील पाडेगावमध्ये नेऊन गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला. १२ जानेवारीला आलिशान कारसाठी लागणाऱ्या ४० लाख रुपयांसाठी अब्दुलआहाद सयाब सिद्दीकी या तरुणाचा त्याचा मित्र उमर नसीर शेख याने खून केला. ‘खतरनाक खिलाडी-२’ हा चित्रपट पाहिला होता. त्यानुसार त्याने अब्दुलआहादचे अपहरण केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com