सेलिब्रिटी वीकएण्ड : स्वयंपाक अन् गप्पांचा 'रिचार्ज' मंत्र

पूजा बिरारी, अभिनेत्री 
Friday, 11 September 2020

मी मूळची पुण्याची. ‘सकाळ ब्युटी कॉन्टेस्ट’मध्ये विजेती झाल्यानंतर मला पहिली मालिका मिळाली ती ‘साजना.’ त्यावेळी  इंडस्ट्रीतलं शेड्युल माझ्यासाठी नवीनच होतं. इथं वेळेचं गणित पाळायलाच लागायचं. परिणामी, सहा-सात दिवस चित्रीकरण केल्यानंतर खूप थकायला व्हायचं; पण आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळाली, की ती खूप मौल्यवान वाटायची.

मी मूळची पुण्याची. ‘सकाळ ब्युटी कॉन्टेस्ट’मध्ये विजेती झाल्यानंतर मला पहिली मालिका मिळाली ती ‘साजना.’ त्यावेळी  इंडस्ट्रीतलं शेड्युल माझ्यासाठी नवीनच होतं. इथं वेळेचं गणित पाळायलाच लागायचं. परिणामी, सहा-सात दिवस चित्रीकरण केल्यानंतर खूप थकायला व्हायचं; पण आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळाली, की ती खूप मौल्यवान वाटायची.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यादिवशी काय करू आणि काय नको, हे कळतच नव्हतं. मात्र, मी सेल्फ केअर, रिलॅक्सिंग हे सर्व प्रकार करायचे. मोठी सुट्टी मिळाली, तर मी  मुंबईहून पुण्याला माझ्या घरी येत असे. त्यावेळी कुटुंबाला क्वालिटी टाईम देत असे. मात्र, एक-दोन दिवस सुट्टी असेल, तर मी ती मुंबईतच घालवत असे.

त्यावेळी चित्रपट पाहणं, फिरायला जाणं, शॉपिंग करणं अन्‍ रेस्टॉरंटमध्ये जाऊन वेगवेगळे पदार्थ खाणं या गोष्टी करत असे. त्याचबरोबर डिस्ट्रेस मसाज घेणं आणि स्पामध्ये जाणं हेही होतं. माझं घर आणि सेटपासून अक्सा बीच जवळ आहे. तिथं मी सूर्यास्ताच्या वेळी जात असे. तिथं मला खूप चांगला अनुभव येतो. तसंच, ऊर्जाही मिळते. 

दरम्यान, ‘साजना’ मालिकेनंतर लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे अनेक गोष्टींना मर्यादा आल्या. आता मात्र ‘न्यू नॉर्मल लाईफ’ सुरू झाले आहे. त्यामुळे सर्व काळजी घेऊन घराबाहेर पडते. सध्या ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेत अभिनय करत आहे. आत्ताही सुट्टी मिळाल्यानंतर मी स्वतःला रिचार्ज करते. वेब सिरीज आणि मूव्हीज पाहते. ऑनलाइन शॉपिंगही करते.

त्याचबरोबर अनेकदा छान-छान चमचमीत पदार्थ करून खाते. तसंच, जवळ राहणाऱ्या मित्र-मैत्रिणींना भेटते. त्यामुळे माझा वीकेंड चांगला जातो. प्रत्येकानं आठवड्यातला शेवटचा दिवस स्वतःसाठी अन् कुटुंबासाठी राखून ठेवावा. त्यामुळे तुम्हाला निश्चितच ऊर्जा मिळेल आणि कुटुंबासाठी वेळ देता येईल.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article pooja birari on food making and discussion