जीवनात काय करायचं, हे कसं निवडावं? (सद्‌गुरू)

sadguru
sadguru

इनर इंजिनिअरिंग

प्रश्‍न : मी कित्येक वेळा काही गोष्टी निवडतो आणि पुन्हा रद्द करतो. उदाहरणार्थ, काही वेळेस मला असे वाटते, की मी संगीताचा अभ्यास करावा. काही वेळेस वाटते मी शैक्षणिक क्षेत्रात जावे. माझ्यासाठी काय योग्य आहे हे कसे जाणून घ्यावे?

सद्‌गुरू : तुम्हाला एक महान संगीतकार व्हायचं असेल आणि तुम्ही तसं बनू शकला नाहीत, तर तुम्हाला किमान एखाद्या संगीतकाराच्या घरी झाडूकाम करावंसं वाटेल, नाहीतर एखाद्या संगीत वाद्यांच्या दुकानात काम करावं वाटेल. कमीत कमी तुम्हाला संगीत वाद्यं तरी स्वच्छ करायला मिळतील. हे असंच असायला हवं, नाही का? तुम्ही संगीत आणि शिक्षणक्षेत्र या दोन्हींमधून एकाची निवड तुमच्या आंतरिक कारणांसाठी न करता सामाजिक कारणांसाठी करीत असाल, यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला अधिक यशस्वी बनवेल या दृष्टीने तुम्ही त्याकडं पाहत असाल, तर त्यामध्ये निवडीला काहीच वाव नाही.

तुम्हाला काय निवड करायची आहे, याची जाण तुम्हाला जर नसेल, तर सध्या उपलब्ध असलेल्या गोष्टींत तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायला हवं. तुम्ही संगीताचे दुकान झाडून काढण्यात तुमचं सर्वस्व पणाला लावलंत, तर तुमच्या आंतरिक ऊर्मीनं तुम्हाला काय करायचं ते उमजंल. सध्या हाती असलेल्या कामात स्वतःला; कोणत्याही अडथळ्यावाचून 100 टक्के झोकून द्या. लोक नेहमीच असा विचार करतात, की मला कुठं अडचणी येऊ शकतील? तुम्हाला कुठं अडथळे यावेत हा प्रश्नच नाहीये, प्रश्न असा आहे की, तुम्ही तुम्हाला कुठं रमवावं. कुठं हे तुम्हाला माहीत नसल्यास सध्या जे हाती आहे त्यात संपूर्णपणे मन रमवा. लोक मनापासून खातसुद्धा नाहीत, श्‍वासही घेत नाहीत, उठतही नाहीत किंवा झोपतही नाहीत. त्यांना काय करावं याचं भानच नसतं. ते जे काही करतात, ते अपुरंच वाटतं. ही चुकीची गोष्ट वाटते. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत संपूर्ण सहभाग दाखवा. त्यानंतर जीवन निवड करेल आणि ती निवड कधीही चुकीची असणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com