​ऑर्डर सोडणं कमी करा...

child
child

बालक-पालक

"मुलांशी संवाद' हे आपलं सर्वांत महत्त्वाचं सूत्र आहे. पालक म्हणून असलेली आपली जबाबदारी निभावण्यासाठी, तीही आनंदानं निभावण्यासाठी बालक-पालक संवाद कळीचा ठरतो. तो साधण्यासाठी पालकांनी मुलांची "भाषा' समजून घ्यायला तर हवीच; पण आपली स्वतःची भाषाही प्रयत्नपूर्वक बदलायला हवी.

होय, ती प्रयत्नपूर्वक बदलावी लागते, कारण पालकांची स्वाभाविक भाषा ही "संगोपका'ची नसते, "संरक्षका'ची असते. पोरांना ती "पालकशाही'ची भाषा वाटते. बहुसंख्य मुलांना पालक वापरतात ती भाषा आवडत नसते, हे वास्तव आहे. मुलांना न आवडणाऱ्या भाषेत केलेल्या संवादातून अपेक्षित परिणाम कसा मिळणार? म्हणूनच पालकांनी आपल्या भाषेला वर्षानुवर्षं पडलेली चुकीची "वळणं' बदलायला हवीत. त्यातलं सर्वांत पहिलं चुकीचं वळण असतं मुलांना "ऑर्डर' सोडण्याचं. मुलं लहान असतात आणि लहानांनी मोठ्यांचं ऐकायचं असतं, हा एक जगभरचा अलिखित नियम आहे! "नियम' म्हणता म्हणता मोठ्यांचं (मुकाट्याने) ऐकणं हे मुलांचं "कर्तव्य' होऊन बसतं... मग साहजिकच मोठ्यांना "ऑर्डर' सोडण्याचा हक्क मिळून जातो.

"ऑर्डर' दिलेलं कुणाला आवडतं? आपल्या कंपनीतल्या "बॉस'ला तसा आपल्याला ऑर्डर देण्याचा हक्क असला, तरी त्यानं "ताबडतोब त्या फाइल्स घेऊन या,' असं म्हटलेलं खटकतंच. "जरा फाइल्स घेऊन येताय का?' हे बरं वाटतं. मग... मुलांचे तर तुम्ही "बॉस' नसता, आई-बाप असता... पालक असता, तुम्हाला काही अधिकार जरूर असतो; पण तो प्रेमानं बजावता आला तर? "गुंड्या, जा आतनं माझं पाऊच घेऊन ये,' हे बोलणं गैर नाही... पण हेच काम, "गुंड्या, जरा आतनं माझं पाऊच आणतोस का,' असंही सांगता येतं आणि असं सांगितल्यानं आपल्या पालकपणाला काही कमीपणा येतो, असंही नाही.

"काय फरक पडतो?' हा प्रश्‍न असेल तर असा बदल करून पाहा. तुमचा विश्‍वास बसणार नाही, इतका फरक पडेल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com