मुलांच्या मनांची दखल घ्या!

child
child

बालक-पालक

मुलांची "भाषा' वेगळी असते. ती "बालभाषा' असते. मुलांशी छान संवाद साधायचा असल्यास पालकांनी ही "बालभाषा' समजून घ्यायला हवी... आत्मसात करायला हवी. त्यासाठी "बालभाषे'ची काही खास वैशिष्ट्यं समजून घ्यायला हवीत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे "बालभाषा' ही मुलांच्या मतांची, त्यांच्या भावनांची कदर करणारी असते. प्रत्येकालाच वाटत असतं, समोरच्यानं आपली मतं ऐकून घ्यावीत, त्यांची पुरेशी दखल घ्यावी, कदर करावी. पालकांना वाटतं, तसं मुलांनाही वाटत असतं. पण पालकांकडं "मोठेपणा'चा "ऍडव्हान्टेज' असतो. ते आपली मतं मुलांवर लादू शकतात. मुलं पालकांवर मतं लादू शकत नाहीत. अर्थात, तशी मुलांची इच्छाही नसते. त्यांची एवढीच माफक अपेक्षा असते, की आपली मतं ऐकून घेतली जावीत, आपल्या भावना समजून घेतल्या जाव्यात.

पण मुलांच्या मनांना विचारतो कोण? त्यांच्या भावनांचा विचार करतो कोण?

अनेकदा पालकांच्या मते, मुलांना काही मतं असूच शकत नाहीत. मुलं त्यांच्या परीनं, हवं तर बालबुद्धीनुसार म्हणा, स्वतः काही विचार करत असतात, स्वतःची अशी काही मतं बनवत असतात, हे पालकांच्या लेखीही नसतं. मग त्या मनांची दखल घेणं दूरच!

काही पालकांची काहीशी उलट तक्रार असते, की मुलं मोकळेपणानं बोलत नाहीत. पालक, संवाद साधण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करतात, तरी मुलं पालकांशी संवाद टाळतात. याची तशी अनेक कारणं आहेत. महत्त्वाचं एक कारण म्हणजे, मुलांच्या मते पालक फार बोलतात! सारखे बोलतच असतात. बोलतात म्हणजे काय तर सूचना देतात, धडे देतात, उपदेश करतात. मुलांना हे असं एकसुरी, एकतर्फी बोलणं नको असतं. कारण अशावेळी त्यांना फक्त ऐकून घेणं भाग पडतं. त्यांच्या मतांचा विचार केला जाईल, अशी काही शक्‍यताच त्यांना दिसत नाही. म्हणूनच "आपण खरंच मुलांच्या मतांची दखल घेतो का?' हा प्रश्‍न पालकांनी स्वतःलाच अवश्‍य करून पाहावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com