मुलांना मनातलं "सगळं' बोलू द्या...

father
father

बालक-पालक

मुलं निष्पाप, निरागस असतात, हे खरंच आहे; पण अनेकदा ती चलाख, धूर्त अशीही असतातच. यात आश्‍चर्य वाटण्यासारखं काही नाही. आपण मोठी माणसं जशी असतो, त्याचीच ती काही बाबतीत छोटी प्रतिकृती असतात! ती मुख्यतः अनुकरण करणारी असल्यानं या साऱ्या गोष्टी त्यांनी मोठ्यांकडूनच उचललेल्या असतात. त्यामुळे क्वचित ती आपल्याला अगदी अनपेक्षित असं वागली तरी समजून घ्यावं. प्रत्येक वेळी त्यांनी "गुड बॉय' अथवा "गुड गर्ल' या प्रतिमेनंच बसलं पाहिजे, ही अपेक्षा नसावी. त्याही पुढचा मुद्दा म्हणजे, त्यांनाही मन असतं आणि मनात कधी काय यावं, यावर त्यांचं नियंत्रण नसतं.

मुलं काही वेळा मोकळेपणानं बोलत नाहीत. याचं कारण कधी कधी त्यांच्या मनात "भलतं-सलतं किंवा "वेडंवाकडं' असंही काही येत असतं. आई-बाबा, शिक्षक, नातेवाईक... या सगळ्यांबद्दल मुलांना निश्‍चित आदर वाटत असतो. प्रेम, आपुलकीही वाटत असते, पण काही वेळा त्यांना कुणाचा प्रचंड राग येणं, कुणाबद्दल द्वेष वाटणं हेही स्वाभाविक असतं. क्वचित मुलं मोठ्यांबद्दल काही वेडंवाकडं, टोकाचं, विचित्र बोलतात तेव्हा ती मनात साचलेला राग व्यक्त करीत असतात. काही चुकीचे शब्दही वापरत असतात.
अशा वेळी पालकांनी काय करावं?

पालकत्वाच्या नव्या संकेतानुसार, असा राग व्यक्त करण्याची मुलांना मुभा द्यायला हवी. त्यांच्या मनातलं समजून घ्यायला हवं. चुकीचे शब्द टाळण्याबद्दल त्यांचं प्रबोधन हे त्यानंतर! आपल्या भावनांची पालकांना कदर आहे, हा विश्‍वास मुलांना वाटणं आवश्‍यक आहे. तो नसला तर अशा काही टोकाच्या भावना व्यक्त करणं ती टाळतात आणि आतल्या आत धुसफुसत राहतात. त्याही पुढचा भाग म्हणजे "आपल्या मनात असं काही वेडंवाकडं आलं, म्हणजे आपणच वाईट आहोत,' अशी स्वतःची समजूत करून घेऊ शकतात. असं तर मुळीच होता कामा नये; कारण यातूनच मुलांची "स्व-प्रतिमा' घडत असते. ती योग्य पद्धतीने घडली, तरच मुलं पुढे जीवनातील संघर्षाला अधिक विश्‍वासानं सामोरी जाऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com