‘माध्यमा’संदर्भात शास्त्र काय सांगते?

Education
Education

बालक-पालक
मातृभाषेतून पुरेसा विकास झाल्याशिवाय इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून सर्वसामान्य मुलांना शिक्षण देणं शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे. इथं हे स्पष्ट करायला हवं, की हा मुद्दा कुणाच्या मताचा नाही. मातृभाषेच्या प्रेमाचाही नाही. शास्त्र या संदर्भात काय सांगतं, हेच फक्त महत्त्वाचं आहे. या संदर्भात काय सांगणं, हेच फक्त महत्त्वाचं आहे. या संदर्भात जगभर ते संशोधन झालं आहे, सुरू आहे त्या साऱ्याचे निष्कर्ष अगदी स्पष्ट असेच आहेत. 

अमेरिकेत अल्बर्ट आणि ऑब्लर यांनी १९७८ मध्ये केलेल्या संशोधनातून असं प्रतिपादन केलं की, कोणतीही दुसरी भाषा शिकताना डाव्या मेंदू गोलार्धातील पेशींची वेगळीच संघटना निर्माण व्हावी लागते. दोन भाषा सदृश असतील (उदा. मराठी, हिंदी) तर मेंदूचा उजवा गोलार्ध त्या सादृश्‍याच्या आधारे बरीच मदत करतो. पण दोन भाषांमध्ये खूप तफावत असल्यास सर्व काम डाव्या गोलार्धालाच करावं लागतं. वेद या अभ्यासकानं १९८३मध्ये केलेल्या संशोधनातून पुढील निष्कर्ष मांडले आहेत. 

दुसरी भाषा शिकताना अनौपचारिक (तोंडी संभाषणापुरत्या) पद्धतीनं शिकल्यास मेंदूचा गोलार्ध मदतीला येऊन जुजबी रीतीनं ती भाषा शिकता येते. (त्यात उच्च बौद्धिक क्रियेचा समावेश नसतो.) आपली मुलं ‘जॅक ॲण्ड जिल’ वगैरे बालगीतं म्हणतात व इंग्रजी भाषेचा केवळ मौखिक परिचय करून घेतात. ती क्रिया वरवरची व सोपी असते. प्रत्यक्ष औपचारिक शिक्षणात डाव्या गोलार्धावरच वैचारिक भार पडतो. त्यामुळं मेंदू थकतो. 

परभाषा शिकताना वय हाही महत्त्वाचा घटक ठरतो. वय वर्षं १०पर्यंत मूळ मातृभाषा प्रगत झाल्यावर परभाषा शिकणं सुलभ होतं. 

परभाषेचं उच्चारण व लेखन दोन्ही भिन्न असतील तेव्हाही डाव्या गोलार्धावर अधिक ताण पडतो आणि मुलांना काही कळेनासं होतं. 

या प्रश्‍नावर ‘सेमी इंग्लिश’ हेही उत्तर नव्हे. त्यातून मुलांचं इंग्रजी सुधारावं हा हेतू साध्य होत नाही. गणित व विज्ञान या तांत्रिक विषयातील संज्ञा इंग्रजीतून माहिती होणं वेगळं आणि इंग्रजी भाषा म्हणून चांगली येणं वेगळं. त्यातच बहुसंख्य मुलांना हे विषय मराठीतून कठीण वाटतात. मग ते नीट न येणाऱ्या इंग्रजीतून किती कठीण जात असतील. सेमी इंग्लिशचे विद्यार्थी हे पुढं शास्त्र शाखेकडंच जाणार असं शाळेनंच गृहीत धरणं चुकीचं आहे. शिवाय निवडक हुशार मुलांचे ‘सेमी इंग्लिश’ वर्ग घेणं हाही पर्याय नव्हे. इतर मुलांवर हुशार नसल्याचा शिक्का मारणं अयोग्य ठरतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com