कुणीच तसा ‘ढ’ नसतो

Education
Education

बालक-पालक
स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचे अभ्यासक श्री. शंकर यांनी ‘अज्ञात विवेकानंद’ या त्यांच्या पुस्तकात स्वामीजींचं महाविद्यालयीन शिक्षणाचं ‘प्रगतिपत्रक’ प्रकाशित केलं आहे. स्वामीजींचं कर्तृत्व, त्यांची गुणसंपदा या गुणांच्या तक्‍त्यात थोडीतरी सूचित होते का? ‘नाही’ हे त्याचं उत्तर आहे.

स्वामीजींना तिन्ही वर्षांत प्रथमश्रेणी कधीही मिळाली नव्हती. ज्या इंग्रजी भाषेच्या प्रभुत्वाद्वारे स्वामीजींनी इंग्लंड, अमेरिकेतील श्रोत्यांची मने जिंकली, त्या इंग्रजीतही त्यांनी फार चांगले गुण मिळवले नव्हते. गणित, द्वितीय भाषा, मानसशास्त्र यामध्ये ते ‘काठावर पास’ झाले होते. शिवाय तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र या विषयांतही स्वामी ‘स्कॉलर’ होते, असं म्हणता येत नाही.

अत्यंत चिकाटीनं हे गुणपत्रक मिळवून प्रकाशित करण्यामागचा आपला हेतू स्पष्ट करताना श्री. शंकरजी म्हणतात, ‘शाळा-कॉलेजमधील परीक्षांच्या गुणांचा आयुष्याच्या परीक्षेतील गुणांशी काहीच संबंध नसतो, हे सिद्ध करणारा हा एक अत्यंत दुर्मिळ, परंतु तितकाच बोलका पुरावा ठरावा.’

जगभरातल्या मान्यवर व्यक्तिमत्त्वांची शाळा-कॉलेजमधील प्रगतिपत्रकं अशीच उपलब्ध झाली तर तीही खूपच ‘मनोरंजक’ असू शकतील.
मान्यवरांची काय सामान्यांची काय, तीच कथा! उलट अधिक बोलकी! आहेत. ‘कथा दहावी ‘ड’ची’ या लेखात मीनाक्षी सरदेसाईंनी अशीच उदाहरणं दिली.

राजा नावाचा विद्यार्थी शाळेतल्या कोणत्याही विषयात कधीही पास झाला नाही, पण पाचवीत असतानाच इलेक्‍ट्रिकची कोणतीही वस्तू एका झटक्‍यात दुरुस्त करायचा. तो दहावी पास होणं शक्‍यच नव्हतं. वडिलांनी त्याला इलेक्‍ट्रिकच्या दुरुस्तीचं दुकान काढून दिलं. आज त्याची ‘राजा इलेक्‍ट्रॉनिक्‍स’ नावाची प्रसिद्ध कंपनी आहे. मौज म्हणजे, राजानं शाळेत (दरवर्षी) दहावीला गणितात पहिला येणाऱ्यासाठी बक्षीस ठेवलं आहे!

दहावी ‘ड’ची सरिना दहावीला नापास झाली. तशीच ‘एसएनडीटी’ला ‘एफवाय’ला बाहेरून बसली. तिथं मराठी शिकवायला प्रसिद्ध साहित्यिक येत. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन सरिता कविता करायला लागली. हळूहळू कवयित्री म्हणून तिचं नाव होऊ लागलं. इतकंच नव्हे, तिच्या कवितांचा इंग्रजी भाषेत अनुवाद झाला. तिचे शाळेतले इंग्रजीचे सर म्हणतात, ‘सरिता ‘ढ’ नव्हती. तिला ओळखण्यात आम्हीच ‘ढ’ ठरलो. कुणी सांगावं, उद्या तिची कविता इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात येईल, जी मला शिकवावी लागंल!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com