मुलं शिकती व आनंदी होण्यासाठी...

Education
Education

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
‘रचनावादी शिक्षणपद्धती’नंच मुलं खऱ्या अर्थानं ज्ञान संपादन करतात, वेगानं, चांगलं व अर्थपूर्ण शिकतात, त्यांचा सर्वांगीण विकास होतो हे आता स्पष्ट झालं आहे, मान्यही झालं आहे. 

प्रश्‍न असा आहे, आपल्या शाळांमध्ये ही शिक्षणपद्धती प्रत्यक्षात आली आहे काय? आली असेल तर नेमकी कुठं, कशी, किती प्रमाणात? नुसती तत्त्व, सूत्रं उत्तम असून, काय उपयोग? त्याची अंमलबजावणी व्हायला हवी, तशी ती होणं व्यवहार्य असायला हवं. 

हे सारं पालकांनाही माहिती व्हायला हवं. त्याशिवाय पालक, आपल्या मुलांचं शाळेमध्ये नवशिक्षण होतं आहे, की नाही, हे कसं ठरवू शकणार? ते ठरवता आलं नाही, तर मुलांसाठी योग्य शाळा कशा निवडू शकणार? तसं झालं नाही, तर पालकांना ‘रचनावादा’चं महत्त्व पटून तरी उपयोग काय? तशा शाळा उपलब्ध तर असल्या पाहिजेत! 

त्या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या शाळांची काय सद्यःस्थिती आहे? 
प्रा. रमेश पानसे यांचं काहीसं परखड निरीक्षण असं आहे, ‘आजही बहुतांश खासगी मराठी शाळांतून आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून ६० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली आणि त्याहीपूर्वी ६० वर्ष जन्माला आलेली ‘वर्तनवादी विचारसरणी’ टिकून आहे. पठडीबद्ध, बंदिस्त आणि थोड्यांना यश देऊन, अनेक मुलांना वेगवेगळ्या स्तरांवरचे अपयशी ठरवणारी अशी ही शिक्षणपद्धती अजूनही अवलंबली जात आहे. साहजिकच अशा शाळा त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यात कमी पडत आहेत.’
पालकांच्या दृष्टीनं ही निश्‍चितच चिंतेची बाब ठरते. 

प्रा. पानसे पुढे म्हणतात, ‘‘या खासगी शाळांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या शेकडो शाळा आपल्या विद्यार्थ्यांना शिकतं करण्यात आणि आनंदी करण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. ही एका दिलासाजनक गोष्ट आहे; पण त्यामुळं पालकांनी आपल्या मुलांसाठी खासगी शाळांऐवजी जिल्हा परिषदेच्या शाळांना पसंती द्यावी काय? हे होणं कठीण आहे. पण एक शक्‍य आहे, या जिल्हा परिषदेच्या शाळांनी रचनावाद अंगीकारला आहे तो कसा, तिथली मुलं ‘शिकती’ आणि ‘आनंदी’ का दिसताहेत, हे समजून घेणं! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com