घरातील हजार तासांची शाळा

घरातील हजार तासांची शाळा

बालक-पालक 
आपण मुलांच्या शिक्षणाबद्दल बोलतो आहोत. ते अधिक अर्थपूर्ण, दर्जेदार, आनंददायी कसं होईल, याचा विचार करतो आहोत. त्यासाठी शाळेत मुलं काय व कशी शिकतात, घरानंही त्यांना शिकवणारी शाळा कसं व्हावं याचा विचार करीत आहोत. मात्र, पालक-शिक्षक यांच्याखेरीज मुलांना शिकवणारी एक तिसरीच शाळा सुरू आहे. ज्या शाळेत मुलं सर्वांत जास्त वेळ असतात, तिचं काय?

ही असते हजार तासांची घरातली शाळा!

हेरंब कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणं शिक्षण कायद्यानं प्राथमिक शाळा ८०० तास, तर माध्यमिक शाळा एक हजार तास चालते. मात्र, हजार तासांची दुसरी एक शाळा आपल्या घरातच भरत असते... त्या शाळेत मुलं काय शिकतात इकडे पालकांचं लक्षही नसतं. ती शाळा आहे दूरचित्रवाणी आणि सोशल मीडियाची. होय, घरातली मुलं टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात एक हजार तासांपेक्षा जास्त वेळ बघत असतात. या शाळेमुळं मुलांचं शारीरिक नुकसान होतं, त्यापेक्षाही अधिक कैक पटीत अधिक नुकसान हे मानसिक स्वरूपाचं असतं.

 वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्यानं मुलांना मग हिंसाचार, हिंसक वृत्ती आवडू लागते.

 भीती आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते, त्याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होत असतो.

 स्वातंत्र्य, प्रणय हे त्यांचे आवडते विषय असतात. म्युझिक व्हिडिओज, थरारपट ही त्यांची पसंती असते. त्यातून त्यांच्या संवेदना बोथट होतात. अपघात बघताना मदतीला धावण्यापेक्षा सेल्फी काढण्याची वृत्ती बनते. ओरडणं, शिवीगाळ, प्रसंगी मारहाण यांकडं कल झुकतो.

 आभासी जगातील मूल्यव्यवस्था... जाहिरातीच्या विश्‍वातली घरं, तिथली सुंदर आई, आलिशान गाडी आपल्या वाट्याला का नाही, या विचारातून एक वेगळाच न्यूनगंड निर्माण होतो.

 हे तर वादातीत आहे की, टीव्ही जास्त पाहणाऱ्या मुलांमध्ये स्थूलपणाच्या तक्रारी वाढतात. खेळाची आवड कमी होत जाते. लांब उडीदेखील मारू न शकणारी ही मुलं आयुष्यात काय झेप घेणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com