‘एमएस’चा मागोवा...

Career
Career

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
‘एमएस’ म्हणजे काय रे भाऊ? तर साधेसरळ सोपे उत्तर म्हणजे ट्रम्पबाबाने अमेरिकेत शिरण्यासाठी दिलेले लर्निंग लायसेन्स. ‘एमएस’ करून नोकरी लागली तर ते झाले लाईट मोटार व्हेइकलसाठीचे लायसेन्स, छान पगार मिळाला (सध्याचा आकडा ७१००० डॉलर वर्षाचे) तर ट्रम्पबाबा तुम्हाला ‘एचवन-बी’ देतो. थोडक्‍यात, कमर्शियल व्हेइकल चालवून छान कमावता येते. यानंतर येते ते ग्रीन कार्ड व शेवटी मिळते ती अमेरिकेची सिटिझनशिप. म्हणजेच लर्निंग लायसन्स सर्वांनाच उपलब्ध आहे ना? वाचकांनीच एक शोध घ्यावा, ‘एमएस’ करायला गेलेला कोणी, कधी, कुठेतरी नापास होऊन अडकलेला ऐकलाय तरी काय? असो, तो आपला विषय नाही. 

पदव्युत्तर शिक्षणानंतरची पातळी म्हणजे डॉक्‍टरेट. ही सगळ्यात उत्तम शिक्षणाची व मनाजोगते शिकण्याची उत्कृष्ट संधी. इथे गोलमाल चालत नाही, तर अभ्यासच लागतो. खर्च खूप कमी असू शकतो. जेमतेम आठ ते पंधरा लाखांत उत्तम विद्यापीठांतून (यथायोग्य नव्हे) डॉक्‍टरेट मिळवण्यासाठी भारतात मास्टर्सची डिग्री करून मग ‘जीआरई’ देऊन जाणे हा राजरस्ता समजा ना! ॲग्रिकल्चर, बायोटेक, नॅनोटेक, जेनेटिक्‍स, ह्युमॅनिटीजमध्ये अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, आंतरराष्ट्रीय संबंध अशा जवळपास पन्नास विषयांतील अभ्यासपूर्ण शिक्षण व संशोधनाचा खडतर रस्ता पार केल्यावर जीवनाची दिशा सापडू लागते. पर्यावरण हा तर सध्याचा परवलीचा शब्द येथेच सुरू होऊ शकतो. 

मुख्य म्हणजे, डॉक्‍टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाइडकडे जागतिक दर्जाच्या कंपन्यांचे संशोधनाचे प्रकल्प असतात. लक्षावधी डॉलरचे अनुदान त्यांच्या हाती असते. विद्यार्थी जितक्‍या कष्टाने, जिद्दीने संशोधनात रस घेईल तितकीच गाइड त्यांची काळजी घेतो. आर्थिक बळसुद्धा देतो. अर्थातच, पालकांचे आर्थिक ओझे कमी होते. तिथल्या सर्वोत्तम प्रयोगशाळांत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास कितीतरी पटींनी वाढत जातो, हे गेल्या पंचवीस वर्षांत अनेक संशोधकांशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीतून उलगडत गेलेले एक वास्तवच आहे. मुख्य म्हणजे, हाच आत्मविश्‍वास त्यांना करिअरकडे खऱ्या अर्थाने घेऊन जात असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com