आयुर्वेदाच्या मदतीने जीवनसंतुलन...

Ayurved
Ayurved

चेतना तरंग
आपल्या जीवनाला चार पैलू आहेत. अस्तित्व, उत्क्रांती, व्यक्त होणे आणि नामशेष होणे. ते विश्‍व बनविणाऱ्या पाच घटकांवर अवलंबून आहे. ते म्हणजे पृथ्वी, जल, हवा, आकाश आणि अग्नी. हे अधिक सोपेपणाने समजून घेण्यासाठी आपण हे पाच घटक दृष्टी, गंध, चव, आवाज आणि स्पर्श यांच्याशी जोडू शकतो. आयुर्वेद हा खरेतर जीवनाचा अभ्यास आहे. ‘अयुर’ म्हणजे आयुष्य आणि ‘वेद’ म्हणजे माहीत करून घेणे. आयुर्वेदानुसार आयुष्य किंवा अस्तित्व कठोर नाही, तर लयबद्ध आहे. एवढेच नव्हे, तर हे पूर्ण विश्‍व बनविणारे पाच घटकही कठोर नाहीत. ते एकमेकांमध्ये प्रवाहित होतात. त्यापैकी प्रत्येक घटकात इतर चार मिसळलेले आहेत. आपल्यातील सर्वांत सूक्ष्म घटक म्हणजे अंतराळ; ज्यापासून मन बनलेले आहे. आणि पृथ्वी या सर्वांत मोठ्या घटकापासून आपली हाडे, त्वचा आणि संरचना बनली आहे. हे पुन्हा आणखी तीन दोषांमध्ये विभागले गेले आहे - वात, पित्त आणि कफ. आपल्या शरीरविज्ञानाबरोबरच त्याचे मनात उमटणारे प्रतिबिंब समजून घेण्याचाही हा मार्ग आहे. एखाद्या आजाराची सुरवात सर्वप्रथम विचाराच्या स्वरूपातून होते, हा सूक्ष्मतम पैलू. त्यानंतर विशिष्ट वातावरणातील आवाज आणि प्रकाशाच्या स्वरूपात तो प्रवास करतो.

त्यानंतरच, आजाराचा शरीरामध्ये प्रवेश होतो. त्याची साधी लक्षणे द्रव स्वरूपात दिसतात; ती नाहीशी करता येऊ शकतात. त्यानंतर ती मोठ्या प्रमाणात प्रकट होतात. तिथे औषधोपचाराची गरज भासते. मात्र, आयुर्वेदाच्या सरावाने आजाराची वाढ रोखता येते. आयुर्वेदाच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनात व्यायाम, श्‍वसन आणि ध्यानाचा समावेश होतो. श्‍वास तर आयुष्याला समानार्थीच. आपला श्‍वासच आपले आयुष्य आहे.

श्‍वास आणि आपल्या शरीरातील वात, पित्त आणि कफ या विविध दोषांमधील नाते जाणून घेणे मनोरंजक आहे. हे तिन्ही दोष शरीरातील विशिष्ट अवयवांवर परिणाम करतात. योग आणि सुदर्शनक्रियेसारखे श्‍वसनाचे योग्य तंत्र आणि प्राणायाम या दोषांवर परिणाम घडवून संतुलन साधतात. विविध प्रकारचे प्राणायाम आणि श्‍वसनाच्या तंत्रामध्ये शरीराच्या खालील, मध्य आणि वरील भागासाठी श्‍वसनाचे विशिष्ट प्रकार आहेत.

त्याने शरीराच्या संबंधित भागात संतुलन साधण्यास मदत होते. शांत मन हा आरोग्यावरचा पहिला उपाय होय. तुमचे मन अनेक विचारांनी ग्रस्त असल्यास साहजिकच प्रतिकारशक्ती कमी होते आणि शरीर आजारासाठी तयार होते. याउलट ते शांत, स्थिर, आनंदी असल्यास शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते. ते आजाराला प्रवेश करू देत नाही. श्‍वास आणि ध्यानाचा कौशल्यपूर्वक वापर करून मन शांत करता येते. प्राणायामाबरोबरच जल तत्त्वाचाही वापर करता येतो. उपवासही शरीरयंत्रणेत बरेचसे संतुलन साधण्यास मदत करतात. औषधे हा शेवटचा पर्याय. आयुर्वेदाच्या नित्य सरावातून आयुष्याचा दर्जा वाढवता येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com