श्रद्धा हीच खरी संपत्ती! (श्री श्री रविशंकर)

srisri
srisri

इनर इंजिनिअरिंग 

श्रद्धा तुम्हाला तत्काळ शक्ती प्रदान करते. त्यामुळे श्रद्धा हीच खरी संपत्ती होय. ती तुमच्यामध्ये स्थिरता, शांतता आणि प्रेम आणते. गुरू किंवा ईश्‍वरावर श्रद्धा असणे म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी करायलाच हवे, असे नव्हे. तुम्हाला श्रद्धा ताबडतोब शक्ती देते. श्रद्धा ही महान संपत्ती आहे. तो एक प्रकारचा आशीर्वादच.

श्रद्धेचे तीन प्रकार आहेत. स्वतःवरची श्रद्धा, जग आणि ईश्‍वरावरची श्रद्धा. तुमची स्वतःवरही श्रद्धा असायला हवी. त्याचप्रमाणे जगावर आणि दैवी शक्तीवरही ती असायलाच हवी. दैवी किंवा ईश्‍वरी शक्तीवरील श्रद्धेतूनच तुम्ही विकसित व्हाल. खरे तर या सर्वच श्रद्धा एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक श्रद्धा सशक्त होण्यासाठी तिन्ही श्रद्धा असणे गरजेच. तुमची श्रद्धा परिपूर्ण असल्यास कोणताच प्रश्‍न उद्‌भवत नाही. मात्र, श्रद्धाच नसल्यास प्रश्‍न विचारण्याचा मुद्दाच येत नाही, कारण तुमची उत्तरावर तरी श्रद्धा कशी असणार? मग कुणीतरी तुमची काळजी घेतेय, हे तुम्हाला माहीत असल्यास कोणताही प्रश्‍न विचारण्याची गरजच काय? लोकांची जगावर श्रद्धा असते, मात्र अवघे जग साबणाच्या एखाद्या बुडबुड्यासारखे आहे. लोकांची स्वतःवरतीही श्रद्धा असते, मात्र, त्यांना स्वतःचीच नीट ओळख पटलेली नसते. आपली ईश्‍वरावरती खूप श्रद्धा आहे, असेही ते मानतात, मात्र, ईश्‍वराबद्दलही त्यांना कसलीच कल्पना नसते.

तुम्हाला शंका घ्यायचीच असल्यास ती प्रत्येक गोष्टीवरच घ्यायला हवी. नास्तिक व्यक्तीची स्वतःवरती पूर्ण श्रद्धा नसते. ईश्‍वर किंवा जगावरील श्रद्धेच्या अभावातून भीतीचा जन्म होतो. श्रद्धेत कायम सातत्यही राहू शकत नाही, कारण ती नेहमीच बदलत असते. श्रद्धा तुम्हाला पूर्णपणे श्रद्धावान बनवते. तुमच्यामध्ये श्रद्धा असल्यासच तुम्ही पूर्ण असता. स्वतःवरची श्रद्धा स्वातंत्र्य, तर जगावरची श्रद्धा मन:शांती देते आणि ईश्‍वराप्रती असलेली श्रद्धा तुमच्यात प्रेमभावना जागृत करते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com