प्रेमाचे ‘स्व’रूप जाणा...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग
प्रेम अतिशय व्यापक आहे. विविध वयोगटांतील व्यक्ती आपले प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. अखेरीस त्यांना वाटते, की ते प्रेम व्यक्त करू शकत नाहीत. महर्षी नारदांनी म्हटलेय ‘अनिरवाचनीयम प्रेरणा स्वरूपम’. तुम्ही प्रेम व्यक्त करू शकत नाहीत. खरे प्रेम व्यक्त करण्याच्या पलीकडे असते. ज्ञान किंवा शहाणपणासोबतचे प्रेम परमानंद देते.

त्याचप्रमाणे या दोन्ही गोष्टींशिवायचे प्रेम वेदनादायक असते. तुम्हाला प्रेम वेदना देत नाही. तुमच्या हृदयात केवळ शुद्ध प्रेम असल्यास तुम्ही कुणाची तरी केवळ काळजी करता, असा अर्थ होतो. तुमची त्यांना सर्वोत्तम देण्याची इच्छा असते. त्यानंतर कोणतीच वेदना उरत नाही. मात्र तुम्ही या बदल्यात परतफेडीची अपेक्षा करता किंवा कुठलीही मागणी करता तेव्हा वेदना होतात.

मत्सर, लोभ, उद्धटपणा हे प्रेमातील अडथळे आपण काल पाहिले. प्रेम कधीच दु:खाला आमंत्रण देत नाही. त्यामुळेच प्रेमाबरोबर ज्ञान आणि केंद्रित वृत्ती अतिशय महत्त्वाची ठरते. तुम्ही केंद्रित असल्यास प्रेमातील हे सर्व प्रकारचे अडथळे हाताळू शकता. प्रेमाच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्या या भावना काही क्षणांपुरत्या निर्माण होतील आणि नाहीशाही होतील. त्या समुद्राच्या पृष्ठभागावरील लाटांप्रमाणे असतील. या लाटांप्रमाणे त्या निर्माण होतील आणि जातील. प्रेम ही सुंदर भेट आहे. तुम्ही एखाद्यावर प्रेमाची सक्ती करू शकत नाहीत. तुमची एखाद्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण करण्याची इच्छाच यात अडथळा बनते. तेव्हा थोडे रिलॅक्‍स व्हा. तुम्हाला प्रेम हवे असते, तेव्हा प्रेमाच्या आविष्काराला उशीर होतो.

तुम्हाला कशाची गरज असेल, तर प्रेमाला आपल्या वाटेने जाऊ देण्याची आणि शिथिल होण्याची. तुम्ही शिथिल होऊन आपण स्वतःच प्रेम आहोत, हे ओळखायलाच हवे. प्रेम ही तर स्वतःचीच सावली असते. तुमचा ‘स्व’ मोठा असेल, तेवढी ही प्रेममय सावलीही मोठी असेल. प्रेम संपूर्ण निर्मितीच्याही वर जाते, तेव्हा तुमचा ‘स्व’ही प्रचंड मोठा होतो. स्वतःमध्ये सर्वोच्च शक्तीची पहाट उगवते, तेव्हा आयुष्य एखाद्या उत्सवासारखे होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sri sri ravishankar all is well sakal pune today