संयमातून फुलते जीवन...

Time
Time

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
तुम्ही वासनांच्या प्रभावातून कसे मुक्त व्हाल? व्यसनातून बाहेर पडायचे असलेल्या सर्वांनाच हा प्रश्न पडला आहे. तुम्हाला सवयीतून बाहेर पडायचे असते, कारण त्या तुम्हाला दुःख देतात आणि मर्यादा घालतात. वासनेचा मूळ स्वभाव आहे, तुम्हाला त्रास देणे, जखडून टाकणे आणि जीवनाचा मूळ स्वभाव म्हणजे मुक्त होण्याची इच्छा. आत्म्याला मुक्त कसे व्हावे हे कळत नाही, तेव्हा तो जन्मोजन्मी मुक्तीची याचना करत भटकतो. सवयीमधून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे शपथ होय. शपथ विशिष्ट काळापुरतीच असावी. समजा एखादा माणूस म्हणतो, ‘मी धूम्रपान सोडीन,’ पण तो ते करू शकत नाही. अशा वेळी त्याने काही काळापुरती शपथ घ्यावी की, मी ९० दिवसांसाठी धूम्रपान करणार नाही. कोणाला शिव्याशाप देण्याची सवय असल्यास त्याने शपथ घ्यावी, मी दहा दिवस अपशब्द काढणार नाही.

आजन्म प्रतिज्ञा करू नका. तुम्ही ती लगेच मोडाल. कोणत्याही कारणाने ती मोडल्यास चिंता नको. पुन्हा आरंभ करा. तुम्ही शपथ पाळाल, तेव्हा नवी सुरुवात करण्याची वेळ निवडा आणि पुन्हा सुरू करा. हळूहळू तुमच्या शपथेचा कालावधी वाढवा. त्यातून तो तुमचा स्वभावधर्म बनेल.
तुमचे मन पुन्हा जुन्या प्रवृत्तीकडे वळते तेव्हा दोन शक्यता घडू शकतात.

एकतर तुम्ही नाउमेद होता, स्वतःला दोष देता आणि तुम्हाला वाटते, की आपली काहीच प्रगती झालेली नाही. दुसरी शक्यता अशी की, तुम्ही संयमासाठी ही एक संधी आहे असे समजाल आणि त्याबद्दल आनंदी व्हाल. वाईट सवयी तुम्हाला अडचणीत आणून तुमची जीवनशक्ती शोषून घेतील.

संयमाशिवाय आयुष्य आनंदी आणि रोगमुक्त होणार नाही. उदा. एकदम तीन आइस्क्रीम न खाता दररोज एक आइस्क्रीम खा. असे केल्याने तुम्ही आजारी पडणार नाही. तुमच्या जीवनशक्तीला एक सुलभ मार्ग दाखवा. संयमाद्वारे वरील प्रकारची सवय होऊ शकेल. तुम्हाला त्रास देणाऱ्या त्या साऱ्या सवयींना शपथेत गुंतवून टाका, त्यांना संयमात आणा. आज विशिष्ट काळासाठी शपथ घ्या आणि त्यांची नोंद करा. तुम्ही शपथ मोडल्यास त्याचीही नोंद करा आणि पुढील सत्संगात शपथेची वेळ आणि तारीख सर्वांना सांगा. हे असेच सुरू ठेवा. तुम्हाला संयमात वेदना देतात त्या सवयींना 
संयमातच बांधून ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com