मार्ग : दया आणि कर्माचा...

Flower
Flower

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
काही कर्मे बदलता येतात आणि काही नाही. तुम्ही गोडधोड पदार्थ बनविताना साखर किंवा तूप कमी पडल्यास पुन्हा घालू शकता. दुसरा काही घटक पदार्थही कमी-जास्त करून सुधारता येतो. मात्र एकदा पदार्थ शिजवला, की तो परत पूर्वस्थितीत आणता येत नाही. दुधापासून गोड किंवा आंबट दही बनते आणि आंबट दही गोड करता येते, पण दह्याचे दुधात रूपांतर करता येत नाही. संचित कर्म हे आध्यात्मिक साधनेने बदलता येते किंवा सोयीचे करून घेता येते. प्रारब्ध कर्म बदलता येत नाही. सत्संग सर्व नकारात्मक कर्माची बीजे त्यांना अंकुर फुटण्याची संधी मिळण्यापूर्वीच जाळून टाकतो. तुम्ही कुणाची स्तुती करता तेव्हा तुम्ही त्यांची सत्कर्मे आपलीशी करून घेता. तुम्ही कोणावर आरोप करता, तेव्हा तुम्ही त्यांची दुष्कर्मे घेता. हे जाणून सत्कर्मे आणि दुष्कर्मे दोन्ही दिव्यत्वाला समर्पण करा आणि मोकळे व्हा. कर्माचे मार्ग अनाकलनीय असतात. तुम्ही ते समजून घ्याल तितके चकित व्हाल. कर्म लोकांना एकत्र आणते आणि विभक्तही करते. ते काहींना दुबळे, तर काहींना बलवान बनविते. ते काहींना श्रीमंत तर काहींना गरीब बनविते. जगामध्ये जितके संघर्ष असतील ते सर्व कर्माचे परिणाम आहेत. त्याचे मार्ग तर्कशास्त्र आणि कारणमीमांसेला छेडून जातात.

ही समज तुमची प्रगती करते आणि तुम्हाला प्रसंग किंवा व्यक्तिमत्त्वांना चिकटून ठेवते. ही समज ओघानेच तुम्हाला आत्म्याकडील प्रवासाला मदत करते. फक्त मानवी आयुष्यात कर्मापासून मुक्ती मिळवण्याचे सामर्थ्य असते. मात्र फक्त काही सहस्र व्यक्ती त्यापासून मुक्त होण्याचे ध्येय ठेवतात. नुसती कृती करून कर्म दूर करता येत नाही. फक्त ईश्‍वरी कृपाच कर्माची बंधने नष्ट करू शकते. उपकार दया, दुरावा दर्शविते. अंतर दाखवते.

आपलेपणाची कमी दाखवते. तुमच्या जवळच्या आणि प्रेमाच्या व्यक्तींवर तुम्ही दया दाखवत नाही. ‘मला माझ्या मुलांची दया येते!’ असे पालक सांगताना दिसत नाहीत. तुमचे नाहीत असे तुम्हाला वाटते, केवळ त्यांचीच तुम्हाला दया येते. दया ही राग, निवड आणि हक्क दर्शविते. तुम्ही दयेची याचना करता, तेव्हा स्वतःपुरते पाहता. तुम्हाला कारण आणि परिणामांच्या नियमातून स्वतःची सुटका करून घ्यायची असते. हा भित्रेपणा, पळपुटेपणा आहे. कधीकधी दया ही प्रगतीतील अडसर ठरते. दया नक्कीच थोडासा आराम आणि निश्‍चिती मिळवून देते, पण परिवर्तनाची प्रक्रिया कमकुवत करते. झाडाच्या पानांनी गळतीपासून वाचवण्यासाठी दयेची याचना केली, तर झाडाचे काय होईल? तुम्हाला या निर्मितीची जाण येईल आणि त्यावर विश्‍वास वाटेल तेव्हा तुम्ही निव्वळ हर्षभरित व्हाल. ईश्‍वर रागावलेला आहे आणि तुमची परीक्षा बघत आहे, असे वाटते तेव्हाच तुम्ही दयेची याचना करता. ही स्वतः परमात्म्याच्या मनावर लादलेली क्षुद्र मनोवृत्ती आहे. परमात्मा असा नाही. तो सर्वज्ञानी आणि सर्वांवर प्रेम करणारा आहे. तिथे दयेला थारा नाही.

माझ्यापाशी दया नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे का? इथे जवळीक आहे. इथे दयेला जागा नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com