स्वतःमध्येच रुजताना... (श्री श्री रविशंकर)

sri sri Ravishankar
sri sri Ravishankar

इनर इंजिनिअरिंग 

आज आपण आत्मा आणि मन यातील फरक जाणून घेऊयात. आत्मा हा न बदलणारा असतो, मन मात्र वेळोवेळी बदलत असते. त्यामुळेच आपल्या मनाला चंद्राशी जोडले जाते. चंद्राच्या कृष्ण आणि शुक्‍ल पक्षातील कलांप्रमाणेच मनामध्येही चढ-उतार होत असतात, हा त्याचा अर्थ.

ऋग्वेदातील पुरुषसुक्तामध्ये "चांद्रमा मानसो जयते' असे म्हटले आहे. विराट पुरुषाच्या मनापासून चंद्राची उत्पत्ती झाली, असा याचा अर्थ होतो. मन आणि चंद्राचा सखोल संबंध आहे. मन कधी कोणत्याही कारणाशिवाय आनंदी होते, तर काही वेळा विनाकारण दु:खी होते. "स्वत:चे मन जिंकणाऱ्याने संपूर्ण जगच जिंकले,' असे वर्षानुवर्षे म्हटले जात आहे, ते त्यामुळेच. आपले मन हेच बंधन आणि मुक्ततेमागील एकमेव कारण होय. मग आपण काहीवेळा बंधन अनुभवत असू किंवा काही वेळेस स्वातंत्र्य, त्यामागे मनच असते. त्यामुळेच, आपल्याला आपल्याच मनाला पुन:पुन्हा प्रशिक्षण द्यावेच लागणार आहे. हाच तर सर्व ज्ञानाचा सारांश.

आपण अशा प्रकारे सातत्याने सराव करत राहिलो, तर हळूहळू आपल्याला मनाला एखाद्या व्यक्तीप्रमाणे हाताळण्याची सिद्धी (एक प्रकारची असामान्य क्षमता) प्राप्त होईल. जीवनात वारंवार समस्यांचा सामना केल्यानंतर एकवेळ अशी येते, की या समस्यांचा सामना करतानाही आपल्या चेहऱ्यावर हास्य फुललेले असते. आयुष्यातील प्रसंग सुखद असो की दु:खद, "सर्वकाही अखेरीस काहीच नाही,' याचा एक प्रकारचा साक्षात्कारच होतो. आपली स्वतःमध्येच रुजण्यास सुरवात होते, तेव्हाच हा अनुभव येतो.

स्वतःमध्ये रुजणे किंवा स्वतःमध्ये स्वतःचीच स्थापना करणे, याचा तरी अर्थ काय? आपल्यासमोर व्यक्ती, प्रसंग अथवा परिस्थिती कशीही असली, तरी आपल्या चेहऱ्यावरचे हास्य आणि समतोल वृत्ती मावळत नाही, अगदी क्षणभरासाठीसुद्धा. एखाद्या क्षणासाठी आपली ही वृत्ती मावळलीच, तर ती तेवढ्या क्षणापुरतीच. आपण लगेच पूर्वपदावर येतो. त्यानंतर आपण स्वतःमध्ये अधिक मजबुतीने आणि ठोसपणे पुनर्स्थापित होतो. एखादी व्यक्ती सिद्ध, परिपूर्ण झाली असे म्हणतात, तेव्हा तो स्वतःमध्येच खऱ्या अर्थाने रुजलेला असतो. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com