asia karandak
sakal
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आशिया खंडातून भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे पूर्ण सदस्यत्व असलेले पाच देश आहेत. बहुधा ही संख्या लक्षात घेऊन १९८४ मध्ये पहिली आशिया करंडक स्पर्धा झाली. तेव्हापासून ती सुरूच आहे. आता मात्र वेगवेगळ्या क्रिकेट मालिकांचा भडिमार होत असल्यामुळे भारतीय संघाला आशिया करंडक स्पर्धा खेळण्याची खरंच गरज आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे.