पिंपरी-चिंचवडचं सत्ताकारण

विविध महत्त्वाच्या उद्योगांमुळे देशातील लक्षवेधी व चांगले उत्पन्न मिळवणारी महापालिका म्हणजे पिंपरी-चिंचवड
balasaheb jawalkar book pimpri chinchwadche rajkaran marathi news
balasaheb jawalkar book pimpri chinchwadche rajkaran marathi newssakal

विविध महत्त्वाच्या उद्योगांमुळे देशातील लक्षवेधी व चांगले उत्पन्न मिळवणारी महापालिका म्हणजे पिंपरी-चिंचवड. या महापालिकेच्या क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या तसेच अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्व इथं होऊन गेली.

त्यांनी राज्याच्या राजकारणातही आपला ठसा उमटवला. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाचा बाज काही वेगळाच आहे. इथं २५ वर्षे पत्रकारिता करताना सजगपणानं काम करणाऱ्या बाळासाहेब जवळकर यांनी इथल्या राजकारणाची नोंद घेणारं हे पुस्तक लिहिलं आहे.

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे तटस्थपणानं त्यांनी इथल्या राजकारणाचे धागेदोरे टिपले आहेत. त्यातल्या राजकारणाचे अंतर्गत पैलू नेमकेपणानं उलगडून सांगितले आहेत. दिवंगत नेते अण्णासाहेब मगर, रामकृष्ण मोरे या मागच्या पिढीतल्या नेत्यांबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार,

तसेच अजितदादा पवार, शिवाजीराव आढळराव-पाटील, अमोल कोल्हे अशा बड्या नेत्यांचा या महापालिकेशी असलेला जवळचा संबंध, त्यांच्या कारकीर्दीचा वेध घेताना जवळकर अनेक महत्त्वाच्या घडामोडींची नेमकी माहिती देतात.

सत्यघटना आणि त्यामागचे ताण-तणाव सांगताना कुणाचीही बाजू न घेता दिलेली माहिती वाचकाला खिळवून ठेवते. अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथ म्हणून या पुस्तकाचं महत्त्व आहे. जवळकर यांचं हे तिसरं पुस्तक असून डिजिटल माध्यमातही त्यांनी ते उपलब्ध करून दिलं आहे.

प्रकाशक : नंदकुमार कांबळे, पिंपळे गुरव

(९२२५६६३४५५) पृष्ठं : १८४ मूल्य : ३०० रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com