ढिंग टांग : एकजुटीचे बिल!

माझ्या तमाम प्रिय आमदार बंधून्नो, आणि भगिनीन्नो, सदरील पत्र हाती पडताक्षणी बॅग भरायला घ्यावी,व आठ तारखेच्या आत मुंबईत दाखल व्हावे. एकजूट हेच आपले शक्तिस्थान आहे
British Nandi writes Rajya Sabha elections Unity politics
British Nandi writes Rajya Sabha elections Unity politics sakal
Summary

माझ्या तमाम प्रिय आमदार बंधून्नो, आणि भगिनीन्नो, सदरील पत्र हाती पडताक्षणी बॅग भरायला घ्यावी,व आठ तारखेच्या आत मुंबईत दाखल व्हावे.

माझ्या तमाम प्रिय आमदार बंधून्नो, आणि भगिनीन्नो, सदरील पत्र हाती पडताक्षणी बॅग भरायला घ्यावी,व आठ तारखेच्या आत मुंबईत दाखल व्हावे. एकजूट हेच आपले शक्तिस्थान आहे आणि एकजुटीच्या बळावरच (बहुधा) आपण गेली अडीच वर्षे यशस्वीपणे राज्य चालवले. एकजूट नसती तर काय झाले असते? कल्पनाही करवत नाही.

आपल्या सर्वांना विदित आहेच की राज्यसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून गनिम जोराचा हल्ला करण्याच्या बेतात आहे. कुठल्याही क्षणी दगाफटका होऊ शकतो. तेव्हा आपण साऱ्यांनी एकजुटीने एकाच हॉटेलात राहावे, असा एकजुटीचा विचार आहे. तेव्हा, खालील सूचनांचे तातडीने पालन करावे.

१. एकजूट राखण्यासाठी दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हाटेलात (महागड्या) खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. तथापि, ही पिकनिक आहे, अशा रीतीने कृपया कोणीही वागू नये. तुम्ही आयसोलेशनमध्ये आहात, असे समजावे.

२. एका खोलीत दोन आमदारे राहतील. ऐनवेळी काही अपक्ष आपल्यात सामील झाले तर त्यांना सामावून घ्यावे. अपक्षास मोठा पलंग द्यावा आणि आपण जमिनीवर एक्सट्रा गादी पसरावी. अतिथी देवो भव हे लक्षात ठेवावे.

३. हॉटेल वास्तव्याची कल्पना चर्चेत आल्यावर काही आमदारांनी भेटून ‘राजस्थानात न्या’ असे सुचवले. पुन्हा सांगतो, ही पिकनिक नव्हे! या आमदारांना राज्यसभेच्या मतदानानंतर बघून घेण्यात येईल!!

४. आमदारांचे ढोबळ मानाने दोन प्रकार आहेत : एक घोरणारे, आणि दुसरे न घोरणारे! पैकी घोरणाऱ्या आमदारांना ‘घोरिंग’ खोल्या आणि न घोरणाऱ्यांना ‘नॉन घोरिंग’ खोल्या दिल्या जातील. (हाटेलात काऊंटरवर पोचल्यावर ‘घोरिंग’ की ‘नॉन घोरिंग’ ते जाहीर करावे!)

३. पंचतारांकित हॉटेलात चेक इन करतावेळी पॅनकार्ड, आधारकार्ड या व्यतिरिक्त मोबाइल फोन जमा करावा. ओळखपत्राची फोटोप्रत काढून परत करणेत येईल, परंतु, दक्षतेचा उपाय म्हणून मोबाइल फोन जमा करणेत येईल.

४. चेकाऊटच्या वेळी मोबाइल फोन परत मिळेल. पण त्यावेळी स्वत:चाच फोन उचलून न्यावा, ही विनंती!

५. हॉटेलात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतील. परंतु, शांपूच्या बारक्या बाटल्या, टूथपेस्ट, टूथब्रश तसेच टर्किश टॉवेल मोजून ठेवलेले आहेत याची नोंद घ्यावी! चेकाऊटच्या वेळेला ब्यागा तपासण्यात येतील!!

६. कुठल्याही परिस्थितीत हॉटेलची खोली सोडून कुणालाही बाहेर जाता येणार नाही. बाहेर गेल्याचे आढळून आल्यास ती पक्षविरोधी कारवाई समजून आमदारकी रद्द करण्याची शिक्षा होऊ शकेल, याची सर्व संबंधितांनी नोंद घेणेची आहे.

७. काही आमदारांना वारंवार चहा पिण्याची तल्लफ येते, असे अडीच वर्षापूर्वी (अशाच हॉटेल वास्तव्यात) आढळून आले होते. अशावेळी रुमसर्विसला फोन करुन चहा मागवावा, बाहेर टपरीवर जाण्यास परवानगी मिळणार नाही. टपरीवर गेल्याचे आढळून आल्यास आमदारकी रद्द होऊ शकते.

८. कपडे मोजकेच आणावेत. अडीच वर्षापूर्वी (अशाच हॉटेल वास्तव्यात) घरच्यांचेही कपडे मागवून हॉटेलच्या लाँड्रीत धुऊन घेतल्याचे निदर्शनास आले होते. (बिल पक्षाला भरावे लागले होते. असो.)

९. हॉटेलमधील वास्तव्याच्या काळात कोणीही सांकेतिक भाषेत संभाषण करण्यास सक्त मनाई आहे. शुद्ध मराठीत व मोठ्यांदा बोलावे!

१०. हॉटेल वास्तव्याच्या काळात ‘कमळ पार्टी’शी संबंधित कोणतीही संशयास्पद व्यक्ती हॉटेलच्या लॉबीत आढळल्यास त्वरित पक्षश्रेष्ठींना खबर द्यावी.

११. एवढे करुनही एखादा आमदार फुटलाच, तर त्याच्याकडून पंचतारांकित हॉटेलचे बिल वसूल केले जाईल, याची नोंद घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com