Premium|Bureaucratic Accountability : असंतोष, नोकरशाही आणि लोकशाहीचा अपुरा आशय

Public Administration Reforms : नोकरशाहीची कार्यक्षमता, राजकीय नेतृत्वाचे उत्तरदायित्व आणि नागरिकांचा सहभाग यांचा लोकशाहीशी असलेला संबंध स्पष्ट करताना, प्रशासनाबाहेरील संशोधन संस्था, माध्यमे आणि सामाजिक संघटनांच्या चिकित्सक भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
Bureaucratic Accountability

Bureaucratic Accountability

esakal

Updated on: 

संग्राम गायकवाड - saptrang@esakal.com

नावीन्यपूर्ण कल्पना मांडणे, त्यांची व्यवहार्यता तपासणे, त्यांना आवश्यक पुरावे आणि सार्वजनिक समर्थन मिळवून देणे आणि प्रशासकीय पातळीवर त्यांना अडथळे निर्माण झाल्यास त्यांची चिकित्सा करणे, यासाठी प्रशासनाबाहेरील सक्षम परिसंस्था आवश्यक असते. संशोधन संस्था, विचार मंच, स्वयंसेवी संघटना, संबंधित क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, माध्यमे आणि जागरूक नागरिक यांनी ही भूमिका बजावणे अपेक्षित असते. अशा घटकांनी निर्माण केलेला चिकित्सक दबाव राजकीय नेतृत्वाला निर्णय घेण्यास प्रवृत्त करू शकतो आणि प्रशासनालाही प्रस्थापित कार्यपद्धतींपलीकडे विचार करण्यास भाग पाडू शकतो.

सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘असंतोष, आंदोलने आणि नोकरशाही...’ या लेखात नीरज हातेकर यांनी आंदोलनातून व्यक्त होणाऱ्या व्यवस्थांबद्दलच्या असंतोषाचे विश्लेषण करताना त्यास कारणीभूत असणारा एक घटक म्हणून मुख्यतः नोकरशाहीच्या काही महत्त्वाच्या वैगुण्यांचा ऊहापोह केलेला आहे. लेखातील मुद्द्यांशी सहमत होत असतानाच, या चर्चेची चौकट आणखी व्यापक करण्याची आवश्यकता वाटते. कारण नोकरशाहीच्या कार्यक्षमतेचा प्रश्न हा केवळ प्रशासकीय सुधारणांचा प्रश्न नसून तो आपल्या लोकशाही व्यवस्थेच्या स्वरूपाशी, राजकीय नेतृत्वाच्या उत्तरदायित्वाशी आणि नागरिकांच्या सहभागाशीही जोडलेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com