

Donald Trump
esakal
हर्ष काबरा- saptrang@esakal.com
सीझर हा राजकीय संदिग्धतेचा प्रतीक होता. संस्था आणि सामान्य जनता या दोघांशी असलेले त्याचे संबंध कमालीचे गुंतागुंतीचे आणि दुहेरी होते. जनतेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करत असल्याचा दावा करून त्याने सत्ता बळकावली. अमेरिकेत असेच काही घडत आहे. ही परिस्थिती केवळ अमेरिकेपुरती मर्यादित नाही. तिथल्या राष्ट्राध्यक्षांच्या बेजबाबदार वर्तनामुळे आणि विधानांमुळे ती जास्त प्रकर्षाने जाणवते आहे, इतकेच. प्रत्यक्षात इतर अनेक देशांमध्येही असेच घातक बदल घडत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेजबाबदार वर्तनाकडे पाहताना, त्यांची तुलना रोमन सेनापती आणि मुत्सद्दी ज्युलियस सीझरशी केल्यावाचून राहवत नाही. पण खरी चिंतेची बाब ही आहे, की सीझर हे नाव लोकशाही संस्थांच्या ठिसूळपणाची आणि त्यांच्या ऱ्हासाचीही आठवण करून देते.