esakal | #SaturdayMotivation अन् तिने केले पुरूष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व...
sakal

बोलून बातमी शोधा

tania-shergil

‘लष्कर दिना’निमित्त १४ जानेवारीला दिल्ली कॅंटोन्मेंटमधील ‘फील्ड मार्शल करिअप्पा कवायत मैदाना’त संचलन झाले. या वेळच्या संचलनाचे एक लक्षवेधक वैशिष्ट्य म्हणजे लष्करात सिग्नल विभागात कॅप्टन असलेल्या तानिया शेरगिल यांनी संचलनात पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व केले.

#SaturdayMotivation अन् तिने केले पुरूष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व...

sakal_logo
By
मंजूषा कुलकर्णी

‘लष्कर दिना’निमित्त 14 जानेवारीला दिल्ली कॅंटोन्मेंटमधील ‘फील्ड मार्शल करिअप्पा कवायत मैदाना’त संचलन झाले. या वेळच्या संचलनाचे एक लक्षवेधक वैशिष्ट्य म्हणजे लष्करात सिग्नल विभागात कॅप्टन असलेल्या तानिया शेरगिल यांनी संचलनात पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व केले.

भाजपचे ‘अब तक सत्तावन’

लष्कराच्या इतिहासात ही गोष्ट प्रथमच घडली. लष्कराच्या संचलनात नेतृत्व करणे ही खूप महत्त्वाची आणि गौरवाची बाब असते. हा मान मिळविणाऱ्या तानिया यांना खरोखरच एका उंचीवर नेऊन ठेवलेच, शिवाय त्या दिवशी नेतृत्व करताना त्यांची पाच फूट नऊ इंच उंचीही सर्वांच्या नजरेत भरली होती. तानिया लहान असताना घरी उठता-बसता सैन्यातील गोष्टींची चर्चा कानावर पडत असे. ‘ऑलिव्ह ग्रीन’ रंगातील वर्दीत देशसेवा करणाऱ्या कुटुंबाचा वारसा त्यांना आहे. त्यांचे वडील, आजोबा आणि पणजोबाही लष्कराच्या सेवेत होते. साहजिकच तानिया यांनाही त्याचे आकर्षण होते आणि तशी संधी मिळाली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

तानिया शेरगिल या मूळच्या पंजाबमधील होशियारपूरमधील. मात्र, त्यांचे कुटुंब अनेक वर्षे मुंबईला वास्तव्यास होते. आई शिक्षिका होती, अन्‌ तिचे वडील लष्करात होते. कालांतराने त्यांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलात (सीआरपीएफ) सेवा केली. नागपूर विद्यापीठातून ‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन’ या विषयातून तानिया यांनी बी.टेकची पदवी मिळविली आहे. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत असतानाच त्यांनी लष्करातील सेवेसाठी अर्ज केला आणि निवडही झाली. चेन्नईतील ‘ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी’ (ओटीए) मधून प्रशिक्षण पूर्ण केल्यावर 2017 मध्ये त्यांची लष्कराच्या सिग्नल विभागात नियुक्ती झाली. सध्या त्या मध्य प्रदेशमधील जबलपूरमधील 1 - सिग्नल प्रशिक्षण केंद्रात कॅप्टन पदावर कार्यरत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

घरातील वारसा सांभाळत मुलीने मिळालेल्या संधीचे सोने केले, याचा अभिमान त्यांचे वडील सूरतसिंह शेरगिल यांच्या चेहऱ्यावर संचलनाच्या वेळी दिसत होता. ‘‘हा क्षण अत्यंत अभिमानाचा, यशपूर्तीचा आणि सार्थतेता आहे. माझे तिला आशीर्वाद आहेत,’’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. आता आठवडाभराने प्रजासत्ताकदिनी दिल्लीत विजयपथावर होणाऱ्या संचलनात पुरुषांच्या तुकडीने नेतृत्व त्या करणार आहेत. 

loading image