शाडूच्या मूर्तीचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

गणपती आले घरा - सोनल पवार, अभिनेत्री
गणेशोत्सव म्हटले की, एक वेगळाच उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. गणपतीच्या दिवसात तर आनंददायी वातावरण असते. गणपती बाप्पांच्या आगमनाने एक वेगळाच जल्लोष बघायला मिळतो. मला तर बाप्पा येणार हा आनंदच गगनात मावेनासा होतो. माझ्या घरी दहा दिवसांकरिता बाप्पा विराजमान होतात. या वर्षीपासून आम्ही शाडूच्या मातीची मूर्ती घरी आणण्याचा संकल्प केला आहे. सजावटीसाठी आम्ही फुलांचा अधिक वापर करतो.

थर्माकोलचा पूर्णतः वापर आम्ही टाळतो. चित्रीकरणामुळे सजावटीला अजिबात वेळ मिळत नाही. तरी मला सजावट करण्याची आवड असल्याने चित्रीकरण संपवून मी सजावटीच्या तयारीला लागते. फुलांची सजावट असल्याने तितका अधिक वेळ लागत नाही. अगदी घरगुती पद्धतीने सजावट करण्याकडे आमचा कल अधिक असतो. 

पाहुणे, नातेवाईक गणपती बाप्पांच्या निमित्ताने घरी येतात. माझ्यासाठी भावंडांचा हा भेटीचा सण आहे, तसेही चित्रीकरणामुळे त्यांना भेटणे होतेच, असे नाही. या दिवसात वेगवेगळ्या गोडाधोडाचे जेवण घरी बनवले जाते आणि बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आम्ही बाप्पाचे विसर्जन करतो. ज्याप्रमाणे आपल्याला सण महत्त्वाचे आहेत त्याप्रमाणे सण साजरे करताना पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे वाटते. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आमचा अधिक भर असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity Sonal Pawar maitrin supplement sakal pune today