
चाफेकर हॉटेल
esakal
बटाटा पुरी, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, उपवासाची मिसळ, थालीपीठ, भाजणीचं थालीपीठ, बटाटा वडा, कोंथिबीर वडी हे अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ आजही ‘चाफेकर’ची ओळख आहेत. गेल्या नऊ दशकांमध्ये काही तुरळक बदल वगळता पदार्थ बनवण्याची पद्धत आणि चवीत फरक पडलेला नाही.
वॉ ल्टर चार्ल्स रॅंड या जुलमी ब्रिटीश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडणारे दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर यांच्या घराण्याशी संबंध असलेल्या गोविंद चाफेकर यांनी आपल्या पूर्वजांची री ओढत आपल्या एका वेगळ्या कृतीतून परकियांच्या विरोधात बंड पुकारले होते. ही गोष्ट स्वातंत्र्यपूर्व काळातील. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला इराणहून भारतात आलेल्या इराणी लोकांनी मुंबई शहरात पोटापाण्यासाठी नाक्यानाक्यावर इराणी हॉटेल सुरू केलीत. चहा आणि बेकरीचे पदार्थ ही त्यांच्या हॉटेलची ओळख होती.