कोमेजून गेलेली फुले...

ती लहान मुलं असे का फिरत असतील? यांना कोणी जपणारा नसेल का?
कोमेजून गेलेली फुले...

रस्त्यावर फिरणारी लहान लहान मुलं, भीक मागणारी लहान लहान मुलं, जेव्हा जेव्हा मी पाहतो तेव्हा मला माझ्या मुलांची आठवण येते. मनामध्ये एकदम धस्स होते. ती लहान मुलं असे का फिरत असतील? यांना कोणी जपणारा नसेल का? जेव्हा मी त्या मुलांच्या प्रश्नांना घेऊन खोलामध्ये जातो तेव्हा त्या मुलांना खरंच कोणी वाली नसतो, अशी परिस्थिती आहे. हे झालं रस्त्यावर फिरणारी मुलं, सिग्नलवर भीक मागणारी मुलं आणि ज्यांना कोणीच नाही अशी अनाथ मुले यांच्याविषयी. पण ज्यांना जन्म दिलेला आहे त्यांचे आई-वडील त्यांचा सांभाळ करतात, अशा लहान मुलांना म्हणजे वय वर्ष सात ते चौदा पर्यंतच्या त्या कित्येक मुलांना बालकामगार म्हणून परिस्थितीचा सामना करावा लागतो. हॉटेलमध्ये ठळक अक्षरात लिहिलेलं असतं, इथं बालमजूर काम करत नाहीत. पण जेव्हा किचनमध्ये जाऊन पहिले तर भांडे घासणारे, किचन साफ करणारे, पाणी भरणारे, भाजी कापणारे, आचारी यांना मदत करणारे, अनेक लहान- लहान मुले पाहायला मिळतात. ही परिस्थिती तुम्ही आम्ही बदलू शकत नाही, पण या परिस्थितीमध्ये अडकलेल्या अडचणीत सापडलेल्या त्या प्रत्येक मुलाला आपण मदत मात्र निश्चित करू शकतो. एखाद्या मंदिरावर सुवर्ण कळस चढवण्यापेक्षा एखाद्या मुलाला शाळेमध्ये प्रवेश करून देणे, त्या मुलाच्या शिक्षणाप्रती असलेली जबाबदारी उचलणे, हे त्या कळसापेक्षा कितीतरी मोठं आणि पुण्याचं काम म्हणावे लागेल. अशा कामासाठी तुम्ही-आम्ही अनेकांनी पुढाकार घेतला तर बालमजुरी आणि बाल कामगार यांचे वाढणारे प्रमाण नक्कीच कमी होईल. (Childrens who are begging on road)

आपण नेहमी ऐकतो मुले ही देवाघरची फुले असतात. परंतु, असे आयुष्य अनेकांच्या वाट्याला येईल असे कधी होत नाही. आपण अनेक ठिकाणी पाहतो, भारतातील असे एकही काम करण्याचे ठिकाण नसेल जिथे लहान मुले बालकामगार म्हणून काम करत नसतील. वीटभट्टी, बांधकाम, हॉटेल, बसस्टँड, भंगार गोळा करणारी, बूट पॉलिश अशा अनेक ठिकाणी आपण बालकामगार पाहतो. ज्या वयात मुलांना शिक्षण द्यायला पाहिजे, तिथे आज आपण पाहतो कित्येक मुले कमी वयात कामाला लागतात. अनेकदा आपण का काम करत आहोत, हाही विचार त्यांच्या निरागस मनात नसतो. गरिबीमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक मुलांना कामावर जावे लागते. त्यामुळे, कितीतरी मुले प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहतात.

कोमेजून गेलेली फुले...
व्हॉट्स अ‍ॅप स्टेटसमुळे पत्नीला वाचवता आले पतीचे प्राण

12 जून, जागतिक बाल कामगार निषेध दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी बाल कामगार म्हणून काम करणाऱ्यांची संख्या का वाढत आहे, त्याची कारणे काय आहेत इत्यादी विषयांवर आजच्या दिवशी चर्चा केली जाते. त्याचसोबत बालकांना मजुरी करण्यापासून कसे रोखता येईल याबद्दल माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. बाल कामगारांची संख्या कमी करण्यासाठी अनेक कार्यक्रमातून प्रयत्न दरवर्षी केल्या जातात. हे कार्यक्रम 2002 पासून चालत आलेले आहेत. परंतु, आजपर्यंत बालकामगारांची संख्या कमी झालेली नाही आहे. शासनाने या लहान मुलांसाठी घेतलेले कार्यक्रम कागदोपत्री असतात हे अनेक सर्वेतून पुढे आले आहे.

कोमेजून गेलेली फुले...
काळ्या बुरशीच्या औषधांवर कर नाही, लसींवर पाच टक्के GST

जागतिक बाल कामगार निषेध दिनाचा इतिहास जर आपण पाहिला तर, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) प्रथमच बालकामगार रोखण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर 2002 मध्ये सर्वानुमते कायदा करण्यात आला. त्या कायद्यामध्ये 14 वय वर्षे असणाऱ्या मुलांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा ठरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेमध्ये एकूण 187 देशांचा समावेश आहे. बालकांची स्थिती सुधारावी म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने अनेक कार्यक्रम पार पाडले आहेत. याव्यतिरिक्त बालकामगारांना काम करण्यापासून थांबविण्यासाठी वेळोवेळी सूचना देण्यात येतात.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने आणि युनिसेफने एकत्रितपणे जगभरातील बालमजुरीच्या परिस्थिती विषयी 'चाइल्ड लेबर : ग्लोबल एस्टिमेट्स 2020, ट्रेंड्स एंड दि रोड फॉरवर्ड' हा एक आश्चर्यकारक अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार गेल्या दोन दशकांत प्रथमच बालमजुरी संपविण्याचा जागतिक वेग मंदावला आहे. कोरोना माहामारी येण्याच्या पुर्वी चार वर्षात बाल कामगारांमध्ये 84 लाखाने वृद्धी झाली आहे आणि आता ही संख्या वाढून 16 करोड झाली आहे. कोरोना माहामारीमुळे या संख्येत आणखी भर पडण्याची शंका वर्तविली जात आहे.

जागतिक बाल कामगार निषेध दिन, या दिवसाचे महत्व बालकांच्या विकासावर आधारित आणि केंद्रित आहे. बालमजुरीचे सर्वात मोठे कारण गरिबी अशिक्षितपणा ज्यामुळे अनेक बालकांना कमी वयात काम करावे लागते. अनेकदा, बालकांना जबरदस्तीने कामावर पाठविल्या जाते. जगात संपूर्ण दारिद्रय़ निर्मूलन होण्यासाठी खूप कालावधी लागणार आहे. परंतु, आता बऱ्याच अशा संस्था आहेत ज्या बाल कामगार वाढू नये यासाठी प्रयत्न करतात. बऱ्याच प्रमाणात अनेक संस्था यशस्वी होत आहेत. बालके आपल्या देशाची भविष्य असतात. त्यामुळे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. आपणही एकदा आपल्या बाल मनाला जिवंत करावे आणि जनजागृती करावी.

परिस्थितीपुढे पिचलेल्या त्या आई-वडिलांना आपलं मूल म्हणजे, या सृष्टीचे भवितव्य आपल्या ओझ्याखाली आपल्या व्यसनाखाली आपल्या दारिद्रखाली भिजून जाते, गंजून जाते, कोमेजून जाते याचं काही भान असायचं काहीही कारण नाही. समाजामध्ये जी जाणकार माणस आहेत ज्यांना वाटतं की काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. समाजामध्ये ज्यांना वाटतं का आपला इतिहास, आपलं भविष्य, आपला वर्तमान शाळेमध्ये गेला पाहिजे त्या समाजभान असलेल्या प्रत्येक माणसाने बालमजुरी आणि बालकामगार वाढणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. आणि हो समाजभान आणि समाज म्हणजे दुसरं कोण तुम्ही आम्हीच ना. तसं कुठल्याही आई-वडिलांना कधीही वाटणार नाही की माझं मूल लहानपणी चहाची केटली घेऊन रस्त्याने चहा चहा म्हणत फिरावं, कुठल्याही आई-वडिलांना वाटणार नाही की, माझं मूल लहानपणी हातोडा घेऊन दगड फोडत रस्त्याच्या एका कडेला घामाच्या धारामध्ये लदबद व्हावे, याला कारणीभूत असते ती सगळी परिस्थिती. आपण अनेक वेळा असे फोटो पाहिले आहेत, रस्त्यावर झेंडे विकणारी मुलं, रस्त्यावर सिग्नलवर भीक मागणारी मुलं, शाळेत जाणाऱ्या मुलाकडे किती आकर्षक भावनेने पाहत असतात. त्यांची भावना स्पष्ट आणि प्रामाणिक असते मला कसं आणि कधी असंच याच मुलाप्रमाणे शाळेत जायला मिळेल. हे चित्र पाहून केवळ मन हादरून नाही चालणार आपण काय कृतीमध्ये आणू शकतो याचा विचार झाला पाहिजे.

निदा फ़ाजली ह्यांच्या या ओळी मनाला स्पर्शून जातात...

घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूँ कर लें

किसी रोते हुए बच्चे को हँसाया जाये...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com