Donald Trump : बलाढ्याचे बलाढ्य घोटाळे

एखाद्या संपूर्ण देशाची तहान भागवण्याची ताकद असलेला महासागर म्हणजे भांडवल बाजार.
Former US President Donald Trump
Former US President Donald Trumpesakal

अपूर्वा जोशी apurvapj@gmail.com, मयूर जोशी joshimayur@gmail.com

एखाद्या संपूर्ण देशाची तहान भागवण्याची ताकद असलेला महासागर म्हणजे भांडवल बाजार. ज्या राष्ट्रात भांडवल बाजार नावाचा महासागर नांदतो तिथं समृद्धी येते, आर्थिक सुबत्ता येते, पण काही लोकांची तहान प्रमाणाबाहेर वाढायला लागते, तेव्हा ते या महासागरातून अधिकाधिक पाणी काढायचा प्रयत्न करतात आणि यातूनच मग घडतात ते आर्थिक घोटाळे.

भांडवल बाजाराचे (Capital Market) प्रामुख्यानं दोन प्रकार असतात प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार, ज्याला आपण शेअर बाजार (Stock Market) किंवा स्टॉक एक्सचेंज असं म्हणतो. या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे घडत असतात. घोटाळे करायच्या शेकडो पद्धती सध्या प्रचलित आहेत, त्यात कालानुरूप बदल देखील होत असतात. भांडवल बाजाराचे नियामक, घोटाळे थांबवण्यासाठी नवीन नियम आणत असतात, व्यवहारांवर नजर ठेवत असतात आणि रोज संशोधन करीत असतात.

Former US President Donald Trump
CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

राष्ट्रीय शेअर बाजारानं तर इंडिया फॉरेन्सिक या आर्थिक घोटाळ्यांवर प्रशिक्षण देणाऱ्या भारतातील सगळ्यात जुन्या संस्थेसोबत एक संपूर्ण अभ्यासक्रमच भांडवल बाजारातील घोटाळ्यांवर सुरू केला आहे. भांडवल बाजारातील घोटाळ्यांचा आवाका हा जगातील कोणत्याही इतर घोटाळ्यांपेक्षा खूप मोठा असतो. त्यामुळं त्यावर शिक्षण देण्याची आता गरज भासू लागली आहे.

Former US President Donald Trump
CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

‘पंप आणि डंप’ हा त्यातला सगळ्यात जुना प्रकार आणि आर्थिक विषयांवर व्हिडिओ बनवून प्रसिद्ध बनणारे ‘फ़िन्फ्लुएन्सर्स’ ही त्यातली सगळ्यात नवीन जमात. इन्फ्लुएन्सर मंडळी एखादा व्हिडिओ काढून शेअर बाजारावर नोंदवलेल्या कंपनीच्या समभागांची मागणी वाढवायचं काम लीलया करतात, आणि ही मागणी वाढल्यावर त्या समभागांच्या किमती देखील भडकतात, पण तो व्हिडिओ बनवायच्या आधीच शेअर विकत घेऊन ठेवायचे आणि स्वतःचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आणि लोकांना सांगितले, की एखादा शेअर कसा उपयुक्त आहे आणि कसा अजून वाढायचा बाकी आहे की स्वतःच ते शेअर विकून बाहेर पडायचे. हा सोपस्कार आज अनेक लोक पार पडताना दिसतात. लोकांना फसवण्यासाठी, शेअर ट्रेडिंग मधले प्रगत धडे, गुंतवणुकीवर सतत देखरेख ठेवण्यासाठी फोन-आधारित ऍप, समृद्ध भविष्याचं आश्वासन यावर ‘तज्ज्ञां’द्वारे ऑनलाइन प्रशिक्षण, अशी बरीच आमिषं काही इन्फ्लुएन्सर मंडळी वापरतात.

या व्यतिरिक्त प्राथमिक आणि दुय्यम बाजारात घडणारा अजून एक घोटाळा म्हणजे अंतर्गत माहितीच्या आधारे व्यवहार करणं. माझीच कंपनी, मीच निकाल जाहीर करणार, माझ्याकडं शेअर बाजाराला लागणाऱ्या सगळ्या बातम्या असणार मग माझ्याच कंपनीच्या शेअरच्या किमती किती वर किंवा खाली जाणार हे समजणं मला किती अवघड जाणार? या मानसिकतेला आळा घालण्यासाठी कायद्यानंच अंतर्गत माहितीद्वारे व्यवहार करण्यावर बंदी आहे. पण तरीही अनेक मंडळी नवीन शकला लढवून त्यांच्याकडं असलेल्या माहितीवर पैसे कमवतात. मॅकेन्झी कंपनीचे जागतिक प्रमुख असलेले रजत गुप्ता यांची नोकरी या व्यवहारामुळंच गेली. या व्यतिरिक्त डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं नाव देखील निवडणुकांच्या काही दिवस आधी अशा व्यवहारांसोबत जोडलं गेलं आहे.

त्याचं झालं असं, की २०२१ मध्ये ट्रम्प यांच्यावर तेव्हाच्या ट्विटरनं त्यांच्या समाजमाध्यमांवर व्यक्त होण्यास निर्बंध घातले. ट्रम्प यांची ख्यातीच मुळात प्रत्येक गोष्टीवर आपले मत ठोकून देण्यासाठी होती पण त्यांच्यावर आलेले निर्बंध पचवणं त्यांना अवघड गेलं. अशातच त्यांना दोन युवकांनी ट्रुथ सोशल नावाच्या एका समाज माध्यमाची कल्पना सांगितली आणि त्यांना ती इतकी भावली, की ट्रुथ सोशल चालवण्यासाठी त्यांनी त्यांच्या ट्रम्प मीडिया या कंपनीद्वारे गुंतवणूक पण करून टाकली. त्यांची गाडी एवढ्यावरच थांबली नाही तर त्यांनी आपली कंपनी शेअर बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला पण त्यांना त्याची अधिकृत नोंदणीची प्रक्रिया करत बसायला वेळ नव्हता मग त्यांनी शोध चालू केला तो एका ब्लँक चेक कंपनीचा. या अशा कंपन्या असतात ज्या बाजारात नोंदणीकृत असतात पण त्यांचा व्यवसाय केवळ कागदावरच असतो आणि एखादी मोठी कंपनी येऊन अशा कंपन्यांचे अधिग्रहण करून स्वतःला बाजारावर थेट नोंदणीकृत करून घेऊ शकते.

Former US President Donald Trump
Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

अमेरिकन बाजारावर नोंदणीकृत डिजिटल अॅक्विझिशन कॉर्प नावाची कंपनी अशीच कागदी कंपनी होती. या कंपनीचे समभाग शेअर बाजारात नोंदवले तर होते पण त्या कंपनीचा धंदा तसा काही खास नव्हता मग एक दिवस मायकल आणि जेराल्ड शर्ट्समन नावाच्या दोन भावांनी रॉकेट वन नावाच्या त्यांच्याच एका कंपनीतून या डिजिटल अॅक्विझिशन कॉर्प नावाच्या कंपनीचे भरपूर समभाग विकत घेतले आणि जेव्हा ट्रम्प मीडियाने ही कंपनी विकत घेण्याची घोषणा केली, तेव्हा या कंपनीचे समभाग ८० टक्के वधारले आणि शॉर्ट्समन बंधूंनी रग्गड पैसे कमावून घेतले.

अर्थात अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट या घटनेशी संबंध नव्हता पण निवडणुकीच्या दिवसात आदळआपट करून, रडून भेकून, काहीही करून सगळं लक्ष आपल्याकडे खेचणे हे काही फक्त भारतातलेच राजकारणी करत नाहीत तर देशोदेशी मातीच्या चुली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देखील फेब्रुवारी महिन्यात घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाले. त्यांनी बँकांकडून कर्ज घेताना स्वतःचीच संपत्ती वाढवून दाखवल्याचे आरोप त्यांच्यावर सिद्ध झाले. तिथल्या न्यायालयानं त्यांना साडेचार दशलक्ष डॉलर दंड भरायला सांगितला आहे पण आजही रक्कम भरण्यासाठी त्यांच्याकडं पैसे नाहीत. मग ते आपल्याच ट्रम्प मीडियाच्या बाकी लोकांवर घोटाळ्यांचे आरोप करत चालले आहेत. एकूणच काय तर सध्याचं युग हे घोटाळ्यांचंच आहे मग भारत काय आणि अमेरिका काय, बलाढ्य मंडळी घोटाळे करतात आणि सामान्य माणसे या घोटाळ्यांचे केवळ साक्षीदार बनतात हेच जागतिक सत्य आहे.

(लेखिका ह्या सर्टिफाइड अँटीमनी लाँडरिंगविषयक तज्ज्ञ आणि सर्टिफाइड बॅंक फॉरेन्सिक अकाउन्टंट आहेत, तर लेखक हे चार्टर्ड अकाउन्टंट आणि सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाउंटिंग तज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com