
भ्रष्टाचार केला म्हणून गौतम अदानी यांच्या कंपनीवर खटला भरण्याची तयारी अमेरिकेनं नुकतीच सुरू केली आहे. याबाबतीत मला खूपच आश्चर्य वाटतं. तो त्यांच्या देशातला कायदा असेलही; परंतु दुसऱ्या देशात तो लागू करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला, हा झाला पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे, अमेरिकेत भ्रष्टाचार होत नाही, असं त्यांना म्हणायचं आहे का? माझ्या माहितीप्रमाणे, त्या देशात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होतो.