Crow and Sparrow Story : कावळा-चिमणीची मैत्री; संकटातही टिकणारी की फक्त आठवणी?

Crow and sparrow friendship moral story in Marathi : कावळा आणि चिमणी या रूपकातून लिहिलेली ही कथा मैत्री, कष्ट, यश, संधी आणि जबाबदारी यांतील तफावत विनोदी शैलीत उलगडते. मदतीच्या अपेक्षा आणि टाळाटाळ यावर मार्मिक भाष्य करते.
Crow and sparrow friendship moral story in Marathi

Crow and sparrow friendship moral story in Marathi

sakal

Updated on

सारिका चाटुफळे-कुलकर्णी

एका शहरात एकाच कॉलनीमध्ये कावळा आणि चिमणी राहत असत. कावळा आणि चिमणी लहानपणापासून एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स होते. अडीअडचणीला एकमेकांना मदत करत असत. म्हणजे हल्ली असते ना ‘पार्टनर्स इन क्राईम’, तसे काहीसे. कितीतरी खोड्या दोघांनी एकत्र केल्या आणि मोठ्यांना कळू न देता पचवल्यादेखील. सगळ्यांना आश्चर्यच वाटत असे की दोघे वेगवेगळ्या पक्षांमधील असूनही एकमेकांचे एवढे चांगले मित्र कसे? दोघेही कॉलेजमध्ये असताना कावळा-चिमणीचे प्रेमप्रकरण चालू आहे, अशीदेखील अफवा पसरली होती. खरे खोटे त्या दोघांनाच ठाऊक!

दोघांमध्ये एक मोठा फरक होता. चिमणी खूप कष्टाळू आणि धडपडी होती. आयआयएममध्ये शिक्षण घेऊन नंतर चिमणीने वेगवेगळे कोर्सेस केले आणि स्वतःचे स्टार्टअप चालू केले. लग्न करून ती आता सुखी होती. बँकेचे कर्ज काढून तिने आता ‘मेण अपार्टमेंट’मध्ये पाच खोल्यांचा फ्लॅट घेतला होता.

कावळा मात्र आळशी होता. लहान असल्यापासून टिवल्याबावल्या करण्यातच तो वेळ घालवत असे. मोठा झाल्यावर सुधारेल म्हणून तेव्हा त्याचे आईबाबा फार बोलले नाहीत; पण तो काही बदलला नाही. मोठा झाल्यावरदेखील कुठल्याही कामात तो तरबेज झालाच नाही. सारखा काव काव करत असे. आजूबाजूचे लोक त्याला वैतागत. टाळत. आता त्याचे आईवडील त्याला कामावरून, स्वभावावरून बोलू लागले. शेवटी एका राजकीय पक्षात तो कार्यकर्ता म्हणून जाऊ लागला. थोडेफार पैसे मिळू लागले. पुष्कळ बोलता येत असल्याने राजकीय पक्षात त्याची डाळ शिजली. पक्षाच्या वेगवेगळ्या सभांमध्ये तो भाषणे देऊ लागला. कसाबसा पैसा जमवून त्याने चिमणीच्या घरापासून

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com