esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 मे 2021

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 मे 2021
sakal_logo
By
प्रा. रमणलाल शहा

पंचांग:

रविवार, ता. २ मे, चैत्र कृष्ण ६, चंद्रनक्षत्र पूर्वषाढा, चंद्रराशी धनू/ मकर, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ६.५५, चंद्रोदय रात्री १२.३६, चंद्रास्त सकाळी १०.५४, भारतीय सौर वैशाख १२ शके १९४३.

दिनविशेष -

१९२१ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचा जन्म. 'पथेर 'पांचाली' या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला देशविदेशांत अनेक गौरव मिळाले. पुढील काळात त्यांनी पंचवीस चित्रपट तयार केले व ते सर्व गाजले. साहित्य, चित्रकला, संगीत, छायाचित्रण या विषयांतही ते प्रवीण होते. त्यांच्या अद्वितीय कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना विशेष ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता.

१९९९ : कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्यांच्या बालिकेने ५१ किलोमीटर १०० मीटर स्केटिंग न थांबता ३ तास ५१ मिनिटांत पार केले.

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ: दैनंदिन कामे दुपारनंतर पार पडतील. गुरुकृपा लाभेल.

मिथुन: हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कर्क: कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

सिंह: महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. हितशत्रूंवर मात कराल.

कन्या: तुमचा इतरांवर प्रभाव राहील, संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ : काहींना प्रसिद्धी व सुसंधी लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

वृश्चिक: कौटुंबिक सौख्य लाभेल. ट्रान्स्पोर्ट क्षेत्रास दिवस अनुकूल आहे.

धनू : आरोग्य उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ : नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मीन : शत्रुपीडा नाही. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.